Nashik News : येवल्यात मुख्य जलवाहिनी फुटली! दोन तासांत तब्बल 40 ते 50 हजार लिटर पाणी वाया

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाचे पाणी आटले असून, सध्या चार दिवसांआठड पाणीपुरवठा सुरू आहे
Water ponds accumulated due to burst water channel on Nagar-Manmad road
Water ponds accumulated due to burst water channel on Nagar-Manmad roadesakal

येवला‌ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाचे पाणी आटले असून, सध्या चार दिवसांआठड पाणीपुरवठा सुरू आहे. नगर-मनमाड मार्गावर बाजार समितीजवळ जलकुंभाना जोडणारी मुख्य जलवाहिनी केबल टाकणाऱ्या ठेकेदाराकडून फुटल्याने दोन तासांत ४० ते ५० हजार लिटर पाणी वाया गेले. टंचाईत शहराला मोठा फटका बसला आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात संबंधित ठेकेदारविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik main water channel burst in Yeola 40 to 50 thousand liters of water was wasted in two hours marathi news)

बाजीरावनगर भागातील दोन जलकुंभ भरण्यासाठी मंगळवारी (ता. १२) सायंकाळी साडेपाचला जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी सोडल्यावर रात्री साडेआठपर्यंत जलवाहिनीतून पाणी वाया जाऊन राज्य महवमार्गावर पाण्याचे तळे साचले. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला ही घटना समजताच जलशुद्धीकरण केंद्रातून मुख्य वाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला.

पाणीपुरवठा विभागाने वाहिनीच्या दुरुस्तीचे काम ३८ गाव पाणीयोजनेच्या ठेकेदाराकडून सुरू केले असून, सायंकाळपर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. केबल टाकणाऱ्या ठेकेदाराने यापूूर्वीही शनिपटांगणासह अन्य दोन ते तीन ठिकाणी जलवाहिनी फुटली होती. त्या ठेकेदाराला पालिका प्रशासनाने समज देऊन सोडून दिले होते. शहराला २४ मार्चपर्यंतच पाणी पुरेल इतकाच साठा असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यानंतर पालखेड डावा कालव्याचे आवर्तन सुटण्याची शक्यता आहे.  (latest marathi news)

Water ponds accumulated due to burst water channel on Nagar-Manmad road
Nashik News : नियोजनशून्य कामांमुळे बाजारपेठ ठप्प! समस्यांमुळे व्यावसायिकांची नाराजी

पाणीपुरवठा विस्कळित

मंगळवारी जलवाहिनी फुटल्यामुळे बाजीरावनागर पाणी टाकीवरून बुधवारी हुडको वसाहत, पटेल कॉलनी, श्रीराम कॉलनी, समर्थनगर, बाजीरावनगरचा भाग आदी भागांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. गुरुवारी (ता. १४) या भागांत पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता आर. एस. भालेराव यांनी दिली.

नागरिकांना त्रास

पालिकेकडून एका तासात १२०० लिटर पाणी एका ग्राहकाला दिले जाते. वाहिनी फुटल्याने सुमारे ४२ ग्राहकांचे पाणी वाया गेले. १५ मार्चनंतर शहाराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची दाट शक्यता आहे.

Water ponds accumulated due to burst water channel on Nagar-Manmad road
NMC News : नाशिक महापालिका प्रशासकीय राजवटीची 2 वर्षे; प्रशासक राज लांबले, काम थांबले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com