Malegaon Commissioner ₹80000 Bribe Case : निवृत्तीला अवघे दोन दिवस उरले असताना मालेगाव महापालिकेचा आयुक्त एसीबीच्या जाळ्यात; 80 हजारांची लाच घेताना अटक

Malegaon Municipal Commissioner Arrested in ₹80,000 Bribery Case : निवृत्तीला दोन दिवस शिल्लक असताना ठेकेदारांची बिले आरटीजीएसद्वारे जमा करण्यासाठी ८० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मालेगाव महापालिका आयुक्तांसह तिघांना एसीबीने अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.
Malegaon commissioner ₹80000 bribe case

Malegaon commissioner ₹80000 bribe case

esakal

Updated on: 

नाशिक : निवृत्तीला दोन दिवस राहिलेले असताना ठेकेदाराच्या कामांची बिले बँक खात्यावर ‘आरटीजीएस’द्वारे जमा करण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी चार टक्क्यांप्रमाणे तब्बल ८० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मालेगाव महापालिकेचा आयुक्त रवींद्र शेषराव जाधव याच्यासह स्वीय सहायक नीलेश वसंतराव पाटील यांना गुरुवारी (ता. २९) घोटी येथून, तर लेखापाल हरीश नथुराम डिंबर यास मालेगावातून अटक करण्यात (Ravindra Jadhav ACB arrest news) आली. तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...