Nashik Crime: महिलेला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पुण्यातून अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली कारवाई

Crime News : निखिल उर्फ स्वप्निल संजय बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, बोराळे मळा, जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
Arrested
Arrestedesakal

Nashik Crime News : जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला पुण्याच्या हिंजेवाडीतून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे. (Nashik Man arrested from Pune for trying to burn woman to death marathi news)

निखिल उर्फ स्वप्निल संजय बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, बोराळे मळा, जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कल्याणी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील याने शुक्रवारी (ता. १९) रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास तक्रार केल्याचा राग मनात ठेवून कल्याणी यांना घरात कोंडून घराच्या खिडकी, दरवाजास आग लावली होती. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र संशयित निखिल सदरच्या घटनेनंतर पसार झाला होता. शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक मिलीदंसिंग परदेशी यांना संशयित निखील पुण्यातील हिंजवडी लपून असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने हिंजवडीत सापळा रचून निखीलला ताब्यात घेतले. (latest marathi news)

Arrested
Nashik Fraud Crime : जपान टूरच्या नावाखाली घातला 8 लाखांचा गंडा! पूर्वा हॉलिडेज टूरच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल

अधिक तपासासाठी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे, हवालदार महेश साळुंके, नाइक परदेशी, अंमलदार राहुल पालखेडे, चालक समाधान पवार यांनी बजावली. 

Arrested
Nashik Crime News : ‘तपस्वी’ बंगला हडपण्यासाठी बिल्डरने दिली ‘सुपारी’! संशयित बिल्डरसह दोघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com