Tukaram Bagul
sakal
वणी (नाशिक) : मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणारा मानसिक छळ, अपमान आणि मारहाणीला कंटाळून एका २७ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मांदाणे फाटा (ता. दिंडोरी) येथे घडली आहे. तुकाराम धनाजी बागुल (वय-२७, रा. बिलवाडी, ता. कळवण, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे.