Nashik Mango Export: ‘कोकणच्या राजाची’ लासलगावमार्गे ऑस्ट्रेलिया वारी; अमेरिका पाठोपाठ ऑस्ट्रेलियाला आंबा निर्यात

Mango Export : येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक विकिरण’ केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिल पासून आंबा निर्यातीला सुरवात झाली आहे.
Hapus mangoes processed at the farming center for shipment to Australia.
Hapus mangoes processed at the farming center for shipment to Australia.esakal

Nashik Mango Export : येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक विकिरण’ केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिल पासून आंबा निर्यातीला सुरवात झाली आहे. अमेरिका पाठोपाठ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऑस्ट्रेलियाला आंब्याचे कन्साईटमेंट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे. ९ एप्रिलपर्यंत ४१ हजार बॉक्समधून १४० टन आंबा हा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला निर्यात झाला आहे. (Nashik Mango Export King of Konkan to Australia via Lasalgaon marathi news)

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भारतीय आंब्याला चांगली चव संपूर्ण जगातून पसंती असते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगाव मार्गे झाली असून १४० टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे.

मागील वर्षी एकट्या अमेरिकेत १ हजार टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषक मधून झाली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कूच करू लागला आहेत .(latest marathi news)

Hapus mangoes processed at the farming center for shipment to Australia.
Nashik Mango Export : कोकणाचा राजा लासलगावमार्गे परदेशात; पहिल्याच दिवशी 28 टन आंबे अमेरिकेला रवाना

लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. लासलगाव येथे ३१ ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता.

मात्र, येथे आता कांद्याबरोबर मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.

''मागीलवर्षी एक हजार टन हापूस आंब्याची निर्यात कृषक मधून करण्यात आली होती. यावर्षी मुंबई एअरलाइन्सला बुकिंग मिळण्यास उशीर होत आहे. बंगलोर, हैदराबाद एअरलाइन्समुळे खर्च वाढतो.''- संजय आहेर, अधिकारी कृषक लासलगाव.

Hapus mangoes processed at the farming center for shipment to Australia.
Nashik Hapus Mango : द्राक्षपंढरीत फळाचा राजाचे आगमन; रत्नागिरी हापूस आंबा खातोय भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com