Akshaya Tritiya 2024 : आखाजीसाठी बाजारपेठ सजली! घागर, खरबूज, आंब्याचे दर वधारले, सोने-चांदीची बाजारपेठ सजली

Nashik News : भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या, साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणासाठी मालेगावची बाजारपेठ सजली आहे.
Mangoes being sold on handcart in the market and vendor selling earthen pots for Puja on Akshaya Tritiya.
Mangoes being sold on handcart in the market and vendor selling earthen pots for Puja on Akshaya Tritiya.esakal

विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या, साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणासाठी मालेगावची बाजारपेठ सजली आहे. पितरांच्या पूजेसाठी आणि नव्या वर्षासाठी प्रगतीचे लक्षण मानल्या जाणाऱ्या आंब्यांचे दर यंदा वाढले आहेत. घागरीच्या दरातही किंचित वाढ झाली आहे. (market is decked up for Akshaya Tritiya)

बऱ्याच दिवसांनी कांदा लिलाव सुरू झाल्याने सणासाठी दोन पैसे हाती आल्याने शेतकऱ्यांत तेवढेच समाधान आहे. दरम्यान सोन्या-चांदीच्या बाजारपेठेतही मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. आखाजीचा सण आणि पुरणपोळी व आंब्याचा रस हे समीकरण घट्ट आहे. एखही घर असे नसेल की तेथे पुरणपोळी नाही, त्यामुळे खास आखाजीसाठी येथे परराज्यातून आंबे मागविण्यात आले आहेत.

दोन दिवसापासून येथील आंब्याची बाजारपेठ बहरली आहे. नागरिकांनी आज आंबे, खरभूज, घागर खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. यावर्षी परराज्यातून आंबे बाजारात दाखल झाले असल्याने दर वाढले आहेत. आंबा, घागरीने शंभरी पार केली आहे. अक्षय तृतीयेला घागरीचे पूजन केले जाते. घागरीला या सणाच्या दिवशी विशेष महत्त्व असते. सणाच्या पूर्वसंध्येला घागर, आंबे, खरभूज घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती.

घागरीचे देखील दर प्रत्येकी एक नग शंभर रुपये आहेत. घागरीत पाणी भरून त्यावर खरभूज फळ ठेवत व गौराईचे अक्षय तृतीया सणाला पूजन केले जाते. पूर्वजांना आंब्याच्या रसाची आगारी देत गोड सण साजरा केला जातो. अक्षय तृतीयेच्या सणाला सासरी असणारी महिला माहेरी येते. सासरच्या कामातून चार-आठ दिवस विश्रांतीचे मिळतात. मैत्रिणींबरोबर गप्पा-गाणी आणि झोका खाणे असे माहेरवाशिणींचा दिनक्रम असतो.(latest marathi news)

Mangoes being sold on handcart in the market and vendor selling earthen pots for Puja on Akshaya Tritiya.
Nashik News : पाचव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

मालेगाव शहरात कॅम्प रस्ता, रावळगाव नाका, कॉलेज रोड, सटाणा रस्ता परिसरात बाजारात विक्रीसाठी घाघर मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात दहा हजार घागर विक्रीस आल्या आहेत. प्रत्येकी दर शंभर रुपये आहे. आंब्याचे दर प्रति किलो केशर-150 ते 180, लालबाग-80 ते 100, बदाम-100 ते 120 रुपये आहे.

रत्नागिरी हापूस आंब्याचे दर अडीचशे रूपये आहेत. सर्वाधिक मागणी मात्र केशरला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितेल. बाजारात खरभूजाचे दर 70 ते 80 रूपये आहे. खरभूजांची आवक यंदा कमी असल्याने तेही भाव खात आहे. केळीला 50 रुपये डझन भाव मिळत आहे. सणाच्या पार्श्भूमीवर बाजारपेठेत फळांची मोठी उलाढाल झालेली आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.

एसएनडी ज्वेलर्समध्ये सोने बुकिंगची योजना

मालेगावच्या शरद नामदेव दुसाने ज्वेलर्स या पेढीत शासनाच्या मानकानुसार HUID प्रमाणित हॉलमार्क दागिन्यांची भरपुर व्हरायटी उपलब्ध झाली आहे. सोन्याचे भाव वाढत असले तरी एसएनडी ज्वेलर्सने ग्राहकांच्या सोयीसाठी सोने बुकिंग योजना जाहीर केली असून त्यालाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.

Mangoes being sold on handcart in the market and vendor selling earthen pots for Puja on Akshaya Tritiya.
Nashik Lok Sabha Election : गुन्हा लपविल्याची शांतिगिरींविरुद्ध तक्रार

या योजनेत आज सोन्याचा भाव बुक करावा आणि सोन्याचे भाव वाढले तर बुकिंगच्या भावात दागिने खरेदी करता येतील आणि सोन्याचा भाव कमी झाला तर या कमी झालेल्या भावाने ग्राहकांना दागिने खरेदी करता येणार आहेत.

"लवणखवणाची माती मिश्रित करून घागर बनवली जाते. सणामुळे घागरीला शंभर रुपये दर मिळत आहे. टणक आवाजातून घागर पक्की कि कच्ची हे समजते. माती महागली असली तरी घागरीच्या दरात फारशी वाढ झालेली नाही." - समाधान पवार,घागर विक्रेता

"यंदा बाजारात खरबुजांची उपलब्धता कमी प्रमाणात आहे. खरबूजला प्रति किलो 60 ते 70 रूपये दर मिळत आहे. माल कमी असल्याने खरबूज घेण्यासाठी झुंबड उडत आहे" - तुषार पवार, खरबूज विक्रेता

Mangoes being sold on handcart in the market and vendor selling earthen pots for Puja on Akshaya Tritiya.
Nashik Lok Sabha Election : वृद्धांच्या मतदानास प्रारंभ! आजपासून टपाली मतदान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com