नाशिक : शिवसेनेच्या ‘मामागिरी’ला महानगरप्रमुखांचा हातभार?

इतरांचे ते अतिक्रमण, दारू दुकानाला मात्र संरक्षण
Nashik Mayor contribution to Shiv Sena Mamagiri protection of liquor stores
Nashik Mayor contribution to Shiv Sena Mamagiri protection of liquor storessakal

सिडको : एकीकडे रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी झाडे, गोरगरिबांची घरे व दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली बिनधास्तपणे तोडली जातात. दुसरीकडे मात्र त्रिमूर्ती चौकातील शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाच्या अतिक्रमित दारू दुकानाला सोयीस्करपणे अभय देण्याचे काम महापालिका अतिक्रमण विभाग व याच प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक व महानगरप्रमुखांकडून होत आहे की काय, असा सवाल परिसरातील नागरिकांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

Nashik Mayor contribution to Shiv Sena Mamagiri protection of liquor stores
आमच्या सरकारमुळे गरीब लक्षाधीश ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिडको परिसरातील अतिक्रमण निर्मूलन विभाग हा नेहमीच वादातीत ठरला आहे. सिडको परिसरात भाजीविक्रेते व रस्त्यावरील दुकानदार यांच्याकडून महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी राजरोसपणे लोकांना ब्लॅकमेल करून पैसे घेतात, अशा प्रकारचा धडधडीत आरोप त्यांच्याच तोंडावर प्रभागसभेत नगरसेवकांनी केल्याचे यापूर्वी दिसून आले होते. अतिक्रमण निर्मूलन विभागाचा हाच दुजाभाव नेहमीच या, ना त्या निमित्ताने नागरिकांना दिसून येतो. गोरगरिबांचे संसार मोडण्यात त्यांना अत्यानंद होतो की काय, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. असाच काहीसा चीड आणणारा संतापजनक प्रकार सध्या सिडकोत घडताना दिसत आहे. त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्सदरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली परिसरातील गोरगरीब व सर्वसामान्य दुकानदारांचे दुकान व मकान बिनधास्तपणे तोडण्यात आले. मात्र, शिवसेनेच्या एका माजी पदाधिकाऱ्याचे दारूचे दुकान या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमित अवस्थेत आहे. ते या रस्त्यामध्ये येत आहे. तरीदेखील केवळ तेवढाच भाग सोयीस्करपणे या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सोडला असून, अभय देणारे शिवसेनेचे नगरसेवक व शिवसेना महानगरप्रमुख असल्याचे बोलले जात असल्याने नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गोरगरिबांचे घरे, दुकाने क्षणार्धात तोडून मोकळे

वास्तविक पाहता दारूच्या दुकानामुळे अनेकांच्या घरांची राखरांगोळी झाली आहे. अशा वेळी या दारूच्या दुकानाचे अतिक्रमण मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने तोडणे आवश्यक होते. तसे न करता गोरगरिबांनी कष्टाच्या घामाने बांधलेली घरे व दुकाने मात्र क्षणार्धात तोडून मोकळे झाल्याचा संतापजनक प्रकार येथील नागरिकांना यानिमित्ताने बघायला मिळाला आहे. त्यामुळे महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग २५ च्या नगरसेवकाबद्दल नागरिकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.

Nashik Mayor contribution to Shiv Sena Mamagiri protection of liquor stores
अकाेला : कर भरणार नाही; रस्ता आम्हीच दुरुस्त करतो!

''त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स या रस्ता रुंदीकरणात ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण असेल त्या सर्वांचेच अतिक्रमण महापालिकेकडून काढण्यात येईल. दारूचे दुकान जर अतिक्रमणात येत असेल तर तेदेखील नक्कीच पाडण्यात येईल.''

-डॉ. मयूर पाटील, विभागीय अधिकारी, सिडको

''सदर जागा ही माझी स्वमालकीची आहे. याचा मोबदला महापालिकेने द्यावा. मी स्वतः बांधकाम काढून घेण्यास तयार आहे. विकासाला माझा विरोध नाही. मीच नव्हे तर या रस्त्यावर अनेक जणांची स्वमालकीची जागा आहे. ती या रस्त्यात जात आहे.''

- मामा ठाकरे, माजी नगरसेवक, शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com