Nashik News : नाशिक-कळवण रस्त्याचे चौपदी करण्याची मंत्री गडगरी यांचेकडे खा. भस्कर भगरे यांची मागणी..

Nashik : दिंडोरी मतदारसंघातील विविध रस्ते पुल यांचे कामासंदर्भात खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.
MP Bhaskar Bhagare has met Union Road and Transport Minister Nitin Gadkari regarding the work of road bridges.
MP Bhaskar Bhagare has met Union Road and Transport Minister Nitin Gadkari regarding the work of road bridges.esakal

वणी : नाशिक दिंडोरी कळवण रस्त्याचे चौपदरीकरन, नाशिक आग्रा महामार्गावर दहावा मैल शिरवाडे फाटा, सोग्रस फाटा चांदवड येथे उड्डाणपूल व्हावे, चेन्नई सुरत महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा आदीसह दिंडोरी मतदारसंघातील विविध रस्ते पुल यांचे कामासंदर्भात खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. गडकरी यांनी तातडीने सदर कामांचे प्रस्ताव सादर करण्याचें संबंधित विभागास सांगितले असून मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. (MLA Bhaskar Bhagare demand to minister Gadkari to quadruple Nashik Kalwan road )

नाशिक दिंडोरी वणी कळवण हा रस्ता दोन राज्यांना जोडणारा असून वणी ,सप्तशृंग गड,स्वामी समर्थ केंद्र येथेही दररोज हजारो भाविक येतात तालुक्यात औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणात असून दररोज वाहतूक कोंडी होत अपघात होत आहे त्यामुळे सदर रस्ता तातडीने चौपदरी होणे अत्यावश्यक आहे. (latest marathi news)

MP Bhaskar Bhagare has met Union Road and Transport Minister Nitin Gadkari regarding the work of road bridges.
Nashik News : हिरकणी कक्षाची माया कोरडी! निफाड तालुक्यात बसस्थानकातील कक्ष कुलुपबंद

तसेच नाशिक आग्रा राष्ट्रीय महामार्गावर दहावा मैल, जवळके दिंडोरी, शिरवाडे फाटा, सोग्रस फाटा, चांदवड चौफुली वर सातत्याने अपघात होत असून येथे उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे असताना यात दहावा मैल,चांदवडचे काम मंजूर असून ते अद्याप सुरू झालेले नाही सदर कामे त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली, तसेच मतदारसंघ अनेक रस्त्यांचे रुंदीकरण मजबुती करन होणे पुल होण्याची गरज आहे.

चेन्नई सुरत महामार्ग साठी संपादित होणाऱ्या जमिनीला अल्प मोबदला मिळत असल्याने शेतकरी जमिनी द्यायला तयार नाहीत या प्रश्नबाबत योग्य मार्ग काढत शेतकऱ्यांना न्याय देणे आवश्यक आहे या सर्व बाबी खासदार भगरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कडे मांडल्या त्यावेळी गडकरी यांनी सदर सर्व कामांचे प्रस्ताव मागवून घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

MP Bhaskar Bhagare has met Union Road and Transport Minister Nitin Gadkari regarding the work of road bridges.
Nashik News : पूर नियंत्रण कक्षाचे दिवसरात्र काम सुरू! जलसाठ्याची माहिती संकलित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com