Nashik News : आसखेड्यातील ऐतिहासिक वास्तुंचे रुपडे पालटणार : आमदार बोरसे

Nashik News : राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत तालुक्यातील किल्ले, मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे
MLA Dilip Borse during the groundbreaking ceremony of the development works in Srikshetra Khanderao Maharaj Temple area. Neighbors Sarpanch Deepak Kapadnis and villagers.
MLA Dilip Borse during the groundbreaking ceremony of the development works in Srikshetra Khanderao Maharaj Temple area. Neighbors Sarpanch Deepak Kapadnis and villagers.esakal

नामपूर : राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत तालुक्यातील किल्ले, मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून प्राचीन मंदिर, ऐतिहासिक वास्तुंचे रूप पालटले आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप बोरसे यांनी केले. (Nashik MLA Borse historical buildings in Askheda marathi news)

आसखेडा येथील श्रीक्षेत्र खंडेराव महाराज मंदिर परिसरात भाविकांना मुलभूत सोयी सुविधा निर्माण करण्याच्या कामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यापूर्वी मंदिराच्या बांधकामासाठी लोककनियुक्त सरपंच दीपक कापडणीस यांच्या पाठपुराव्यामुळे ७० लाख रुपयांच्या निधीतून मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दरम्यान, मंजूर निधीतून श्रीपूरवडे येथील भिमाशंकर मंदिर, आसखेडा येथील श्रीक्षेत्र खंडेराव महाराज मंदिर, इतिहासकालीन साल्हेर किल्ला, दोधेश्‍वर मंदिर आदी पर्यटनस्थळांचा विकास होणार आहे. (Latest Marathi News)

MLA Dilip Borse during the groundbreaking ceremony of the development works in Srikshetra Khanderao Maharaj Temple area. Neighbors Sarpanch Deepak Kapadnis and villagers.
National Peoples Court : येवल्यात लोकअदालतीत 905 प्रकरणांमध्ये 1 कोटी 26 लाख शुल्क वसूल!

सुविधाही मिळणार

मंदिर परिसरात भाविकांना विश्रामगृह, बगीचा, पाण्याची टाकी, पेव्हरब्लॉक, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आसखेडा येथील भूमिपुत्र राज्याच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे २ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. प्रगतिशील शेतकरी राजेंद्र सावळा यांनी सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या खंडेराव महाराजांच्या मूर्ती मंदिरासाठी दिल्या आहेत.

यावेळी प्रा. गुलाबराव कापडणीस, गोराणेचे सरपंच दिनेश देसले, बिजोटे सरपंच पोपट जाधव, खिरमाणी सरपंच बाबा भदाणे, फोफीर सरपंच रवींद्र पवार, मनिंद्र सावंत, राजेंद्र सावळा, दीपक मोरे, सोसायटी अध्यक्ष अमृत कापडणीस, जया सावळा, आर्किटेक्ट श्री. बेडेकर, श्री. पवार, पर्यटक निरीक्षक अधिकारी यश कापडणीस, उपसरपंच रवींद्र सावळा, संजय सावळा, ग्रामविकास अधिकारी एस. एस. खैरनार उपस्थित होते.

MLA Dilip Borse during the groundbreaking ceremony of the development works in Srikshetra Khanderao Maharaj Temple area. Neighbors Sarpanch Deepak Kapadnis and villagers.
Maha Shivratri 2024: नांदूरमध्यमेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त यात्रा! रथासह मुखवट्याची मिरवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com