Nashik: बहुउद्देशीय केंद्र स्थापनेसाठी मनपाचा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुउद्देशीय केंद्र स्थापनेसाठी मनपाचा पुढाकार

नाशिक : बहुउद्देशीय केंद्र स्थापनेसाठी मनपाचा पुढाकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक :आयटी कंपन्यांचा नाशिकमध्ये विस्तार होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बहुउद्देशीय केंद्र स्थापनेसाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून, त्यासंदर्भात औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांशी एक बैठक नुकतीच पार पडली. या वेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून कॉमन फॅसिलिटी सेंटर व टेक्नॉलॉजी सेंटरसाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही देण्यात आली.

महापालिकेकडून आयटी पार्क मंजूर करण्यात आला. आयटी पार्कसाठी महापालिकेकडून पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहे. परंतु, त्याव्यतिरिक्त कॉमन फॅसिलिटी सेंटर, कन्व्हेन्शन सेंटर, रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट सेंटर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, सेंटर ऑफ एक्सलन्स फोर ॲग्रोटेक, फिनटेक, प्रॉडक्ट गॅलरी, इनक्युबेशन सेंटर आदी सुविधा असलेले प्लग ॲन्ड प्ले सॅटेलाईट अर्थात बहुउद्देशीय केंद्र स्थापन करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य शासनाचे उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापालिका, केंद्र सरकारच्या सुक्ष्म लघु व माध्यम उद्यम बोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकार, उद्योग विभागाचे सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महापालिकेच्या नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आहेर, नगरसेविका हिमगौरी आहेर-आडके, उद्योजक अरविंद महापात्रा, उद्योजक अरविंद कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, शशांक वाघ, अभिषेक निकम आदी उपस्थित होते. एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नितीन गवळी यांनी प्रकल्पासाठी आश्‍वासन दिले. कॉमन फॅसिलिटी सेंटर, तसेच टेक्नॉलॉजी सेंटर इत्यादी योजनेसाठी असलेला निधी मंजूर करून आणण्याची ग्वाही या वेळी श्री. पेशकार यांनी दिली.

loading image
go to top