SAKAL Exclusive: नाशिक- मुंबई अंतर अवघ्या 2 तासांवर! समृद्धीला जोडणारा महामार्गासाठी 750 कोटी

पुढील महिन्यात ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देवून वर्षअखेर महामार्गाचे काम किमान पन्नास टक्के करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.
NHAI News
NHAI Newsesakal

नाशिक : वेगवान प्रगतीला कारणीभूत ठरणाऱ्या नाशिक- मुंबई महामार्गाचे विस्तारीकरणाबरोबरच समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्यात आली आहे.

जवळपास १०७५ कोटी रुपये महामार्ग विस्तारीकरणाला खर्च केले जाणार आहे. यात पिंपळगाव ते गोंदे या दरम्यान महामार्गाचे सहापदरीकरण, तसेच गोंदे ते पिंप्री सदो येथे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी सहापदरी काँक्रीटचा महामार्ग तयार केला जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) त्यासाठी निविदा प्रसिद्ध केली असून, पुढील महिन्यात ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देवून वर्षअखेर महामार्गाचे काम किमान पन्नास टक्के करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. (Nashik Mumbai distance in just 2 hours 750 crore for highways connecting Samriddhi SAKAL Exclusive)

नाशिक शहरासह नाशिक महानगर प्राधिकरणाच्या हद्दीतील पिंपळगाव व गोंदे या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. महामार्गावर तासाला १६० अवजड वाहने उतरतात.

देशातील पहिल्या दहा महामार्गांमध्ये सर्वाधिक रहदारीच्या महामार्गामध्ये नोंद होते. मुंबई ते धुळे या दरम्यान महामार्गावर वाहनांची गर्दी होते. धुळे व मुंबई या दरम्यान महामार्गावर नाशिक मोठे शहर लागते.

त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक ठप्प होणे, वायु व ध्वनिप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे महामार्गाचे विस्तारीकरण आवश्‍यक आहे.

त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग विस्तारीकरणाबरोबरच नवीन महामार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव ते गोंदे या साठ किलोमीटर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण केले जाणार आहे.

त्यासाठी २७५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महामार्गाचे विस्तारीकरण करताना आवश्‍यक त्या ठिकाणी डांबरीकरणाऐवजी वरचा थर काँक्रीटचा केला जाणार आहे. सहापदरीकरणानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

नवीन सहापदरी महामार्ग

इगतपुरी तालुक्यातील गोंदे ते पिंप्री सदो हा समृद्धी महामार्गाला जोडणारा २० किलोमीटरचा नवीन सहापदरी महामार्ग तयार केला जाणार आहे.

त्यासाठी साडेसातशे कोटी रुपये खर्च केला जाणार असून, महामार्गासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. भूसंपादन व आवश्‍यक त्या ठिकाणी पूल व अंडरपास टाकले जाणार आहे.

NHAI News
Nashik: जिल्हा महिला कल्याण विभागाने केली 'त्या' प्रकरणाची चौकशी; शाळेची मान्यता काढून घेण्याची शिफारस

मुंबई प्रवासाला वेग

नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी सध्या तीनऐवजी पाच तास लागतात. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. डिसेंबर २०२४ अखेर इगतपुरीपासून आसनगावपर्यंतचा समृद्धीचा दुसरा टप्पा खुला होत आहे.

नाशिक जिल्ह्यात समृद्धीला जोडणारे दोन इंटरचेंज आहे. पहिला नांदूरशिंगोटे व दुसरा पिंपरी सदो येथे नांदगाव सदोपासून ७.२ किलोमीटरचा बोगदा सुरू होतो. समृद्धी महामार्गावर वाहन चढविल्यानंतर अवघ्या दीड तासात मुंबई गाठता येणार आहे.

परंतु समृद्धी महामार्गापर्यंत पोचण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गावरील वाहतूक व पुढे गोंदेपासून पिंप्री सदोपर्यंत पोचण्यासाठी लागणारा कालावधी अधिक आहे.

परंतु सहा पदरी काँक्रिटच्या महामार्गामुळे नाशिक ते समृद्धी इंटरजेंचपर्यंतचे अंतर अर्धा तासात येणार असल्याने सुरत-चेन्नई ग्रीन फिल्डमुळे जसे नाशिक-सुरत अंतर दोन तासांवर येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक-मुंबईचे अंतरदेखील दोन तासांवर येईल.

"पिंपळगाव बसवंत ते गोंदे या ६०० किलोमीटर रस्त्यासाठी २७५ कोटी रुपये खर्च करून सहापदरीकरण करणे व सिमेंट काँक्रिटीकरण करणे. त्याचप्रमाणे गोंदेपासून पिंपरी सदो हे समृद्धी महामार्गाला जोडणारे वीस किलोमीटर काँक्रीटचा सहापदरी महामार्ग तयार केला जाणार आहे. त्यासाठी साडेसातशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे."- भाऊसाहेब साळुंके, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

NHAI News
NMC News: रिक्तपद भरती प्रश्नपत्रिकेचे महापालिका करणार अवलोकन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com