Nashik Municipal Corporation Election | भाजप शहरात लढणार स्वबळावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

News about Nashik municipal corporation election Marathi political News

नाशिक महानगरपालिका निवडणूक | भाजप शहरात लढणार स्वबळावर

नाशिक : भाजपने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात पुन्हा अच्छे दिन येणार असल्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर आता भाजपकडूनदेखील शिवसेनेला टक्कर देण्यासाठी शंभर प्लसचा नारा देण्यात आला आहे. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. सर्वच जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आल्याने भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले.

भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी त्यांच्यामार्फत घोषणा केली. १३३ जागांसाठी इच्छुकांनी आपल्या संपूर्ण बायोडाटासह अर्ज भरून देण्याचे आवाहन त्यांनी केले. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल, असे पालवे यांनी जाहीर केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. २१) नाशिकमध्ये येत असून, त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

निवडणूक हालचाली गतिमान

प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ता राखण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली असून, केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या कामांचे मार्केटिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पक्षाकडून झालेल्या सर्वेक्षणात पुन्हा अच्छे दिन येणार असल्याचे दिसून येत असल्याने आता शंभर प्लसचा दावा केला जात आहे. त्यासाठी शहरातील सर्व ४४ प्रभागांतील १३३ जागांवर निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी स्वतःची संपूर्ण माहिती असलेला फॉर्म भरून देण्याचे आवतन देण्यात आले आहे. पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात इच्छुकांचे फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहा मंडल अध्यक्ष किंवा भाजप कार्यालयामधून इच्छुकांनी फॉर्म घेऊन भरून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Nashik Municipal Corporation Election Bjp Marathi Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top