Nashik News : चर खोदण्यासाठी शासनाला स्मरणपत्र!

Nashik News : गंगापूर धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने धरणाच्या मध्य भागातील पाणी जॅकवेलपर्यंत ओढून आणण्यासाठी चर खोदली जाणार आहे.
Gangapur Dam (file photo)
Gangapur Dam (file photo)esakal

Nashik News : गंगापूर धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने धरणाच्या मध्य भागातील पाणी जॅकवेलपर्यंत ओढून आणण्यासाठी चर खोदली जाणार आहे. मात्र, आचारसंहितेमुळे चर खोदता येत नाही. चर खोदण्यासाठी महापालिकेने शासनाकडे परवानगी मागितली आहे. (municipal corporation sought permission from government to dig ditches)

मात्र, गहाळ झालेल्या प्रस्तावानंतर पुन्हा पाठविलेल्या फेरप्रस्तावाला प्रतिसाद मिळतं नसल्याने अखेरीस महापालिकेमार्फत पुन्हा स्मरणपत्र दिले जाणार आहे. नाशिक महापालिकेसाठी जलसंपदा विभागाने ५२०४ दशलक्ष घनफूट आणि आरक्षित केले आहे. वास्तविक महापालिकेने ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली होती.

मात्र मराठवाड्याला पाणी सोडल्याने आरक्षण कमी करण्यात आले. त्यामुळे ११ जुलैपर्यंत पाणी पुरणार आहे. जवळपास १९ दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल निर्माण होणार असल्याने महापालिकेने गंगापूर धरणाच्या मध्य भागात असलेले ६०० दशलक्ष घनफूट पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यासाठी चर खोदण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

Gangapur Dam (file photo)
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, भगरेविरोधातील तक्रारी निकाली; छाननीअंती नाशिक मतदारसंघातून 36 जणांचे अर्ज वैध

परंतु चर खोदण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवत असतानाच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे तातडीची बाब म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याच्या मुख्य सचिवांकडे चर खोदण्यासाठी परवानगी मागितली. मुख्य सचिवांकडे प्रस्ताव गेल्यानंतर तातडीने मंजूर मिळेल, असे अपेक्षा होती.

मात्र सदर प्रस्ताव गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे महापालिकेने पुन्हा फेरप्रस्ताव सादर केला. फेरप्रस्तावावरदेखील मुख्य सचिवाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता पुन्हा स्मरणपत्र पाठविले जाणार आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

Gangapur Dam (file photo)
Nashik Lok Sabha Constituency : महायुती विरुध्द महाविकास आघाडीत प्रचार युध्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com