Nashik NMC : महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांना वेग!

Nashik News : हवामान विभागाने यंदा वेळेत व अधिक प्रमाणात पावसाचे प्रमाण राहील, असा अंदाज वर्तविल्याने महापालिकेने पावसाळापूर्व कामांना गती दिली आहे.
Employees during drain cleaning.
Employees during drain cleaning.esakal

Nashik News : हवामान विभागाने यंदा वेळेत व अधिक प्रमाणात पावसाचे प्रमाण राहील, असा अंदाज वर्तविल्याने महापालिकेने पावसाळापूर्व कामांना गती दिली आहे. शहरात ३७ हजार १४९ मीटर लांबीच्या नाल्यांची सफाई त्याचबरोबर दहा हजार ४१ चेंबर्स साफ केल्याचा दावा केला आहे. शहरामध्ये पावसाचे पाणी तुंबून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. (Municipal Corporation speeded up pre- monsoon works)

त्यामुळे दरवर्षी शहरात पावसाळापूर्व कामे केली जातात. यात नैसर्गिक नाल्यांची सफाई, चेंबर साफ करणे, पावसाळे गटारांची स्वच्छता करणे आदी कामे केली जातात. यंदादेखील महापालिकेने पावसाळापूर्व कामे सुरू केली आहे. आत्तापर्यंत ७५ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात केला आहे.

शहरातील लाख ६३ हजार २२ मीटर लांबीचे पावसाळी गटार असून त्यावर १३ हजार ९४६ चेंबर्स आहेत. त्यातील १० हजार ४१ चेंबर्स साफ करण्यात आले आहे. १ लाख २१ हजार मीटर लांबीच्या पावसाळी नाल्यांपैकी ३७ हजार १३९ मीटर लांबीचे नाले साफ करण्यात आले आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. (latest marathi news)

Employees during drain cleaning.
Nashik Police Election Duty : EVM च्या ‘स्ट्राँग रुम’ भोवती पोलिसांची फुट पेट्रोलिंग! दरतासाला सुरक्षेचा आढावा

पावसाळा नाला सफाई

एकूण लांबी (मीटर ) आवश्यक सफाई साफ केलेले नाले

१,२१,०१ ५०,९२६ ३७,१४९

-------------------------------------------

आरसीसी चेंबर सफाई

एकूण लांबी (मीटर ) एकूण चेंबर साफ केलेले चेंबर

३,६३,०२२ १३,९४६ १०,०४१

------------------------------------

पावसाळी खुली गटार साफसफाई

गटार एकूण लांबी ( मीटर) आवश्यक सफाई साफ केलेले नाले

९२७७१ ५८०४८ ४१५९७

Employees during drain cleaning.
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी, नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपकडून बूथनिहाय मतदानाचे विश्‍लेषण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com