नाशिक : मनपा निवडणुकीच्या तोंडावर रामरथ आंदोलन पेटणार?

Nashik Municipal election
Nashik Municipal electionsakal

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून पंचवटी व नाशिक गावठाणात सुरू असलेल्या कामांमुळे दोन वर्षांनी निघणाऱ्या रामरथ व गरुड रथाच्या मार्गात अडथळे निर्माण होणार असल्याने ऐन निवडणुकीत रथाच्या मिरवणुकीचा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काळाराम मंदिर संस्थानने स्मार्टसिटी कंपनीला पत्र देत मिरवणूक मार्गावरील कामे त्वरेने पूर्ण करताना अडथळे दूर करण्याची मागणी केली, तर आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी आंदोलनाची वेळ येवू देवू नका, असा इशारा देताना तातडीने काम पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

श्रीराम व राम रथाची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली. या वर्षी नियम शिथिल असल्याने रथोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. रथोत्सवाचा पारंपरिक मार्ग ठरलेला आहे. मालवीय चौकातील रामरथ गोदावरी नदीच्या किनाऱ्यार्यंत आणला जातो. गरुडरथ मात्र संपूर्ण मार्गाची परिक्रमा करतो. यंदा रथोत्सवाच्या मार्गावर स्मार्टसिटीकडून कामे सुरू आहेत. यात रस्त्याची कमी- जास्त उंची तसेच अनेक भागात रस्ते खोदून ठेवल्याने मिरवणुकीत अडथळे निर्माण होणार आहे. विशेष करून दहीपुल, दिल्ली दरवाजा येथे अरुंद रस्ता झाल्याने गरुडरथाची मिरवणूक काढता येणार नाही. सरदार चौक ते रामकुंड या दरम्यान काम सुरू असल्याने अडथळे येतील. शनी चौक ते काळाराम मंदिराच्या रस्त्यावर अडथळे आहेत. त्यामुळे काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष व जिल्हा न्यायाधीश आर. आर. राठी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना पत्र देत मार्चअखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

''दोन वर्षांच्या कालखंडानंतर रथोत्सव होत असल्याने रथ मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे अडथळे नको. आंदोलन झाल्यास स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल.

- ॲड. राहुल ढिकले, आमदार''

''रथाच्या मार्गातील अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावी. असे पत्र स्मार्टसिटी कंपनीला संस्थानतर्फे देण्यात आले आहेत. कामे वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहेत.''

- मंदार जानोरकर, विश्‍वस्त, श्री काळाराम मंदिर देवस्थान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com