Nashik-Pune Railway: नाशिक-नगर-पुणे रेल्वे मार्गाचं काम कुठे अडलंय? कधी सुरु होणार?; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

महाविकास आघाडी सरकारनं या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. पण सध्या हे काम रखडलं आहे.
Ajit pawar
Ajit pawaresakal

मुंबई : महाविकास आघाडी सरकारनं नाशिक-नगर-पुणे या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाची घोषणा केली होती. पण सध्या हे काम रखडलं आहे. यावर बोलताना उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकल्पाचं काम नेमकं कुठे अडलंय? आणि कधी सुरु होणार? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. नाशिक इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. (Nashik Nagar Pune Railway line project work stuck When will it start Ajit Pawar said it clear)

Ajit pawar
Ajit Pawar: सिल्वर ओकवर अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळेंची भेट; काय झाली चर्चा?

अजित पवार म्हणाले, कालच चार्ज घेतला आणि त्यानंतर लगेचच हा प्रकल्प विकसित करणारी कंपनी महारेलचे अधिकारी जैस्वाल यांना मी बोलावून घेतलं होतं. त्यांच्याकडून सगळं समजावून घेतलं. हे काम रेल्वे मंत्रालय दिल्लीत थांबलेलं आहे. रेल्वेची स्वतःची कामी मतं आहेत. त्यामुळं हा प्रकल्प रखडला आहे. (Latest Marathi News)

Ajit pawar
Israel News: सायकल चालवताना भीषण अपघात, चिमुकल्याचं शीर धडावेगळं! डॉक्टरांनी घडवला चमत्कार

पण याबाबत मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करावी लागणार आहे. कारण रेल्वे मंत्र्यांचं म्हणणं असं आहे की, हा प्रकल्प आम्हाला देण्यात यावा. आपण महारेल या वेगळ्या कंपनीमार्फत हा प्रकल्प राबवणार होतो. कारण नाशिक-नगर-पुणे या सर्वांना जोडणारा ही महत्वाची रेल्वे लाईन आहे. त्यातून सर्वांनाच मदत होणार आहे. मी आता याच्या पाठीमागं लागणार आहे. हा प्रकल्प कोणी करायचा? याबाबत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर हा विषय संपवून जमीन अधिग्रहन सुरु करावं लागेल"

Ajit pawar
Ajit Pawar: सिल्वर ओकवर अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळेंची भेट; काय झाली चर्चा?

नाशिकची हवाई वाहतूक सुरळीत होणार का?

नाशिकचे प्रकल्प नागपुरला पळवले जात आहेत, तसेच इथली हवाई वाहतूक सुरळीत होईल का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, "नाईट लँडिंग सुरळीत व्हावं याचा पाठपुरावा आम्ही करतो आहोत. पुरवणी मागण्यांमध्ये देखील या कामासाठी काही निधी टाकला आहे. यासंदर्भात कुठल्या अडचणी येणार नाहीत. प्रकल्प देण्याबाबत भेदभाव करुन चालणार नाही, सगळीकडं सारखाच विकास झाला पाहिजे. गुंतवणूकदार जर म्हणाले की, आम्हाला या भागात जायचं तर त्यांना आम्ही वेगवेगळ्या सवलती पण देऊ"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com