Nashik Accident News : नामपूर-सिन्नर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; आतापर्यंत 17 जणांचा बळी

Nashik Accident : राज्य क्रमांक १७ हा नामपूर ते सिन्नर या महामार्गाचे काम मागील चार ते पाच वर्षांपासून संथगतीने सुरु आहे.
Nashik Accident News : नामपूर-सिन्नर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; आतापर्यंत 17 जणांचा बळी

Nashik Accident News : राज्य क्रमांक १७ हा नामपूर ते सिन्नर या महामार्गाचे काम मागील चार ते पाच वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. त्यामुळे या महामार्गावरील कळवण ते पिळकोस शिवारा दरम्यानच्या प्रवासात आतापर्यंत अनेक अपघात होऊन १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अंदाजे दोनशे नागरिक जखमी झाले आहे. त्यामुळे हा महामार्ग नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहे. (Nashik Nampur Sinnar highway has become death trap)

कळवण ते पिळकोसपर्यत संबंधित ठेकेदाराने फक्त मुख्य रस्त्यावर डांबरीकरण करून आजूबाजूच्या साइडपट्टा न केल्याने रस्ताच्या कडेला मोठ्या खड्डे असल्याने वाहनचालक ओव्हरट्रक करताना अंदाज न आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहे. तसेच काही ठिकाणी रस्ता मोठा तर काही ठिकाणी लहान झालेला आहे.

तीव्र उतार ठरतोय अपघातास कारणीभूत

सतत अपघाताच्या घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागावर पिळकोस, बगडू, नवी बेज, जुनी बेज या परिसरातील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. रस्ता नूतनीकरण वेळेस ग्रामस्थांनी संबंधिताना याठिकाणी अपघात होतात. त्यामुळे पुलाच्या दक्षिणेकडील तीव्र उताराच्या रस्त्याला दोन्ही बाजूस सुरक्षित कथडे तयार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र याकडे विभागाने दुर्लक्ष केल्याने या भागात अनेक अपघात घडले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Nashik Accident News : नामपूर-सिन्नर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; आतापर्यंत 17 जणांचा बळी
Nashik Accident News : मध्यप्रदेशात चालत्या कारचे स्टेअरिंग लॉक; कानमंडाळे येथील द्राक्ष उत्पादकाचा जागीच मृत्यू

''रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. या कामावर प्रवाशांना कोणत्याच प्रकारचे सूचना फलक नाही. वळणावर कोठेही गतिरोधक नाही. तसेच वळणाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर बसविलेले नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.''- शीतलकुमार अहिरे, ग्रामपंचायत सदस्य जुनीबेज

''राज्यमार्ग १७ हा वाहतुकीसाठी जीवघेणा ठरत आहे. बगडू येथे यात्रा असल्याने आनंदाचे वातावरण होते. मात्र गावातील तरुणाचा या महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत असलेल्या पिकअप वाहनचालक याच्यावर कारवाई करावी तसेच अपघात रोखण्यासाठी उपयायोजना कराव्यात.''- मोती वाघ, उपसरपंच बगडू

''नवीबेज ग्रामपंचायत मार्फत संबंधित विभागाशी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून निवेदन देऊनही संबंधित विभागाने रस्त्यावर कुठेच गतिरोधक बसविले नाहीत. पांढरे पट्टे मारले नाहीत व रस्ता विस्तारीकरणात अपघात ठिकाणी रस्त्याच्याकडेला साइड पट्ट्या नसल्याने दररोज छोटे मोठे अपघात होत असून संबंधित ठेकेदारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.''- प्रवीण गांगुर्डे , ग्रामपंचायत सदस्य, नवीबेज

Nashik Accident News : नामपूर-सिन्नर महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; आतापर्यंत 17 जणांचा बळी
Nashik Accident News : डंपरने कांद्याच्या ट्रॅक्टरला 200 फूट फरफटत नेले; ताहाराबाद रस्त्यावर अपघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com