Nashik News : नाशिकच्या विद्यार्थ्याने नवी दिल्लीत उचलले टोकाचे पाऊल

Nashik : दिल्लीतील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
Varad Sanjay Nerkar
Varad Sanjay Nerkaresakal

Nashik News : नवी दिल्ली आयआयटी महाविद्यालयात एमटेक शिक्षण घेत असलेल्या वरद संजय नेरकर (वय २४, रा. मैत्रप्रेरणा अपार्टमेंट, सिद्धिविनायक परिसर, हनुमानवाडी) या विद्यार्थ्याने गुरवारी (ता. १५) दिल्लीतील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. जळगाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बीटेक केल्यानंतर वरद याची एमटेकच्या शिक्षणासाठी निवड झाली होती. (students took an extreme step)

२०२२ पासून तो दिल्लीच्या आयआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याचा हा कोर्स पूर्ण होण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला होता. त्याच वेळी त्याच्या आत्महत्येचे वृत्त आल्याने परिसरात सर्वांना धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येची माहिती महाविद्यालयाकडून कळताच त्याचे आई-वडील दिल्लीला रवाना झाले.

Varad Sanjay Nerkar
Nashik News : सप्तशृंगगड विकासासाठी 10 कोटींचा निधी उपलब्ध; 7 वर्षांनी विकासकामांना प्रारंभ

वरद याचा मृतदेह रात्री विमानाने मुंबईला आणण्यात येणार असून, सकाळी दहापर्यंत ते पंचवटीत पोचण्याची शक्यता असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. आई गृहिणी असून, वडील महापालिकेत बांधकाम विभागात सेवेत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ असा परिवार आहे.

Varad Sanjay Nerkar
Nashik News : रेणुका संस्था मालमत्तेचा लिलाव, आर्मस्ट्राँग विरोधात कायदेशीर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com