NMC News : नाशिककरांवरील करवाढ टळली; अंदाजपत्रक सादर

NMC : २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६१.०३ कोटी रुपये आरंभीच्या शिल्लकेसह दोन हजार ६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
Nashik: While presenting the budget of the Municipal Corporation for 2024-25, Commissioner Ashok Karanjkar. City Engineer Shiv Kumar Vanjari, Madan Harishchandra, Chief Accounts Officer Dattatray Pathrut, Additional Commissioner Pradeep Chaudhary, Smita Zagde, Deputy Commissioner Laxmikat Satalkar, Superintending Engineer Sanjay Agrawal etc.
Nashik: While presenting the budget of the Municipal Corporation for 2024-25, Commissioner Ashok Karanjkar. City Engineer Shiv Kumar Vanjari, Madan Harishchandra, Chief Accounts Officer Dattatray Pathrut, Additional Commissioner Pradeep Chaudhary, Smita Zagde, Deputy Commissioner Laxmikat Satalkar, Superintending Engineer Sanjay Agrawal etc.esakal
Updated on

NMC News : २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६१.०३ कोटी रुपये आरंभीच्या शिल्लकेसह दोन हजार ६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ५३५ कोटी रुपये भांडवली कामांसाठी उपलब्ध राहिल्याने महापालिकेची (NMC) आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे स्पष्ट झाले आहे. (NMC)

उत्पन्न वाढीसाठी बांधा, वापरा व हस्तांतर (बीओटी) या तत्त्वावर मिळकती विकसित करण्याबरोबरच महापालिकेच्या जागांवर मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी व सहा ते सात ठिकाणी पार्किंगच्या जागा भाडे तत्त्वावर वापरण्यास दिले जाणार आहे. भाजपच्या महापालिकेतील सत्ताकाळातील आयटी व लॉजिस्टीक पार्क व्यवहार्य नसल्याने बगल देण्यात आली.

शहराच्या प्रवेशद्वारावरील ट्रक टर्मिनसची संकल्पना मोडीत काढत बाह्यवळण रस्त्यांवर ट्रक टर्मिनल उभारण्याची मागील वर्षाच्या अंदाजपत्रकात करण्यात आलेली घोषणा हवेत विरली आहे. प्रशासकीय राजवटीतील २०२४-२५ या आर्थिक वर्षातील दुसरे अंदाजपत्रक प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शुक्रवारी (ता. १६) सादर केले.

अंदाजपत्रकात घर व पाणीपट्टीत वाढ झाली नाही. परंतु उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने ‘बीओटी’वर मिळकती विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ते चालविण्यास दिले जाणार आहे. ‘जीएसटी’ माध्यमातून मागील वर्षात १३५० कोटी रुपये अनुदान प्राप्त होणार आहे.

Nashik: While presenting the budget of the Municipal Corporation for 2024-25, Commissioner Ashok Karanjkar. City Engineer Shiv Kumar Vanjari, Madan Harishchandra, Chief Accounts Officer Dattatray Pathrut, Additional Commissioner Pradeep Chaudhary, Smita Zagde, Deputy Commissioner Laxmikat Satalkar, Superintending Engineer Sanjay Agrawal etc.
NMC News : वस्त्रांतरगृह महापालिका येणार ताब्यात

त्यात ८ टक्के वाढ तसेच १ टक्का मुद्रांक शुल्क असे एकूण १४७२ कोटी ४९ लाख रुपये उत्पन्न ग्राह्य धरण्यात आले आहे. मालमत्ता व पाणीपट्टीतून मागील वर्षी २७८ कोटी ५९ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. त्यानुसार ४८. ३३ कोटी रुपये उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा करताना पुढील आर्थिक वर्षात ३४८. १६ कोटी रुपये उत्पन्न ग्राह्य धरण्यात आले.

नगररचना विभागाकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात २३७ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होते. मात्र नगररचना विभागाकडून अवघे १०८ कोटी रुपये प्राप्त झाल्याने मागील वर्षाचे जमेचा ताळमेळ ढासळला.

व्यवसायासाठी परवाना बंधनकारक

राज्य शासनाने महसुल वृद्धीची अट घातल्याने उत्पन्नवाढीचा भाग म्हणून महापालिका हद्दीतील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापनांकडून परवाना शुल्क वसुल केले जाणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ३१३, ३७६ ते ३८६ चा आधारे कारखाने, उद्योगधंदे, उद्योग आस्थापना, हॉटेल्स, खानावळी, उपाहारगृहे, स्वीट मार्ट, केक शॉप, आइस्क्रीम पार्लर, केशकर्तनालय.

Nashik: While presenting the budget of the Municipal Corporation for 2024-25, Commissioner Ashok Karanjkar. City Engineer Shiv Kumar Vanjari, Madan Harishchandra, Chief Accounts Officer Dattatray Pathrut, Additional Commissioner Pradeep Chaudhary, Smita Zagde, Deputy Commissioner Laxmikat Satalkar, Superintending Engineer Sanjay Agrawal etc.
NMC News : चालु आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक वादात! महापालिकेला 23 फेब्रुवारीपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी

ब्युटीपार्लर, खाद्यतेल, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ, तसेच कारखाने व उद्योगधंद्यासाठी लागणारे परवाना शुल्क आकारले जाणार आहे. वाणिज्य स्वरूपाच्या इलेक्ट्रॉनिक, एलईडी, फ्लेकसवर शुल्क आकारले जाणार आहे. निर्धारित कालावधीनंतर या परवान्याचे नूतनीकरणही करावे लागणार आहे.

बीओटीतून विकास व पार्किंग

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी ‘बीओटी’वर मिळकतींचा विकास केला जाणार आहे. बीओटीतून दिडशे कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्याचबरोबर शहरात ८ ठिकाणी पार्किंग स्लॉटवर पेड पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या माध्यमातूनदेखील उत्पन्नात वाढ केली जाणार आहे.

महापालिकेच्या जागांवर टॉवर

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी वाहतूक बेटे, मोकळ्या जागांवर नागपूरच्या धर्तीवर मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने तीनशे टॉवर उभारण्याचे नियोजन आहे. शहरात १५०० मोबाईल टॉवर आहेत. यातून तीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.

Nashik: While presenting the budget of the Municipal Corporation for 2024-25, Commissioner Ashok Karanjkar. City Engineer Shiv Kumar Vanjari, Madan Harishchandra, Chief Accounts Officer Dattatray Pathrut, Additional Commissioner Pradeep Chaudhary, Smita Zagde, Deputy Commissioner Laxmikat Satalkar, Superintending Engineer Sanjay Agrawal etc.
NMC News : घरपट्टी देयेकांसाठी महापालिकेचे Android App!

असे येईल उत्पन्न (कोटीत)

- जीएसटी- १४७२.४७ (५६.५६ टक्के)

- मालमत्ता कर- २४१.२५ (९.२७)

- नगररचना- २०८.७३ (८.०२)

- पाणीपट्टी- ७३.२२ (२.८१)

- विविध कर (बाजारपट्टी)- २२४.६९ (८.६३)

- रोड डॅमेज, कनेक्शन फी- ९९.१८ (३.८१)

- अनुदाने- ७.५३ (०.२९)

- परिवहन सेवा- ०

- संकीर्ण- २८.६६ (१.१०)

- अग्रिम- १८६.७२ (७.१७)

- कर्ज- ०.०१ (०.०)

- सुरवातीची शिल्लक- ६१.०३ (२.३४)

Nashik: While presenting the budget of the Municipal Corporation for 2024-25, Commissioner Ashok Karanjkar. City Engineer Shiv Kumar Vanjari, Madan Harishchandra, Chief Accounts Officer Dattatray Pathrut, Additional Commissioner Pradeep Chaudhary, Smita Zagde, Deputy Commissioner Laxmikat Satalkar, Superintending Engineer Sanjay Agrawal etc.
NMC News : अपघातप्रवण क्षेत्रातील अतिक्रमणांवर हातोडा; पंचवटी विभागातून होणार कारवाई

असा होईल खर्च (कोटीत)

- पाणीपुरवठा, मलनिस्सारण- २१२.३६ (८.१६ टक्के)

- विद्युत व यांत्रिकी- ९७.०६ (३.७३)

- सार्वजनिक आरोग्य सेवा- ४४.३३ (१.७०)

- घनकचरा व्यवस्थापन- १४२.४७ (५.४७)

- उद्यान व्यवस्थापन- ३३.९३ (१.३०)

- समाजकल्याण- १६४.५१ (६.३२)

- शिक्षण- १२.३७ (०.४८)

- सार्वजनिक वाहतूक- ९३.१० (३.५८)

- नगर नियोजन व्यवस्थापन- १२० (४.६१)

- मालमत्ता कर- २.७५ (०.११)

- प्रभाग विकास निधी- ५६.४८ (२.१७)

- अन्य विभाग- १६७.५४ (६.४३)

- आस्थापना खर्च- १००१.८३ (३८.५०)

- अग्रिम- १०७.१४ (४.१२)

Nashik: While presenting the budget of the Municipal Corporation for 2024-25, Commissioner Ashok Karanjkar. City Engineer Shiv Kumar Vanjari, Madan Harishchandra, Chief Accounts Officer Dattatray Pathrut, Additional Commissioner Pradeep Chaudhary, Smita Zagde, Deputy Commissioner Laxmikat Satalkar, Superintending Engineer Sanjay Agrawal etc.
NMC News : कालिदास कलामंदिरात वातानुकूलित यंत्रणेसाठी दीड कोटी खर्चाची तयारी!

अंदाजपत्रकात महत्त्वाचे

- महापालिकेच्या जागेवर मोबाईल टॉवर उभारण्यास परवानगी

- पेठ रोडचे रुंदीकरण

- मिळकतींचा बीओटीवर विकास.

- शहरात आठ पार्किंग विकसित करणार.

- वाणिज्य आस्थापनांवर जाहिरात परवाना शुल्क लागू होणार.

- घरपट्टी व पाणीपट्टीत करवाढ नाही.

- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १० कोटी टोकन.

- शहरात २५ आपला दवाखाने.

- फेरीवाल्यांकडून ऑनलाइन पद्धतीने दैनंदिन जागा लायसन्स फी वसुली.

- एनजीओंच्या माध्यमातून रोड सेफ्टी ऑडिट.

- रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा पुनर्विकास.

- सिडको, नाशिक रोड व पंचवटीला विद्युतदाहिनी.

- आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आर्थिक तरतूद.

- कत्तलखान्यांचा पुनर्विकास.

Nashik: While presenting the budget of the Municipal Corporation for 2024-25, Commissioner Ashok Karanjkar. City Engineer Shiv Kumar Vanjari, Madan Harishchandra, Chief Accounts Officer Dattatray Pathrut, Additional Commissioner Pradeep Chaudhary, Smita Zagde, Deputy Commissioner Laxmikat Satalkar, Superintending Engineer Sanjay Agrawal etc.
NMC News : स्वमालकीच्या जागांवर महापालिका उभारणार मोबाईल टॉवर! खासगी इमारतीवरील टॉवर टप्प्याटप्प्याने बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com