Fri, Feb 3, 2023

Nashik News : सिन्नर- शिर्डी महामार्गावर मृत गोवंश अवशेषांची खुली वाहतूक
Published on : 18 December 2022, 8:41 am
वावी : सिन्नर- शिर्डी महामार्गावर मृत गोवंश अवशेषांची खुली वाहतूक करणारा ट्रक रविवारी (ता. 18) वावी गावाजवळ पकडण्यात आला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा ट्रक पकडला असून यासंबधी माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
हेही वाचा: Nashik Crime News : नाशिकरोडच्या बालाजी हॉस्पिटलवर कारवाई; अवैध गर्भलिंग चाचणी मशिन सापडले
या ट्रकमध्ये मृत गोवंशाचे अवशेष आहेत. मुंबई येथील कत्तलखान्यातून हे अवशेष औरंगाबादकडे नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक तरुणांनी सदर वाहन पोलीस ठाण्यात आणले आहे. मृत गोवंश अवशेषांची खुल्या पद्धतीने वाहतून होत असल्याने नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.