Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त 104 मंडळांना परवानगी

Shiv Jayanti 2024 : पोलिस आयुक्तालयात शिवजयंती साजरी करणाऱ्या सुमारे ३५० मंडळांनी नोंदणी केली आहे.
Police Commissioner Sandeep Karnik while guiding the meeting organized on the occasion of Shiv Jayanti.
Police Commissioner Sandeep Karnik while guiding the meeting organized on the occasion of Shiv Jayanti.esakal
Updated on

Shiv Jayanti 2024 : पोलिस आयुक्तालयात शिवजयंती ( shiv jayanti 2024 ) साजरी करणाऱ्या सुमारे ३५० मंडळांनी नोंदणी केली आहे. त्यातील १०४ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित मंडळांना शनिवार (ता. १७) सायंकाळपर्यंत परवानगी देण्यात येणार, अशी माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. (Shiv Jayanti 2024)

शिवजयंतीनिमित्त भद्रकाली पोलिस ठाण्यात आयोजित शहराच्या मुख्य शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. सोशल मीडियामुळे बऱ्याचदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवजयंती प्रमाणेच आगामी विविध धर्मीय सण, उत्सवात सोशल मीडियावरून कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.

सायबर क्राईम तसेच पोलिस विभागाच्या अन्य विभागांना तशा सूचना देण्यात आल्या आहे. नागरिकांनी विशेषतः तरुणांनी याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तर डीजेला परवानगी नसून पारंपारिक वाद्यात मिरवणूक काढण्यात यावी. अशा सूचना पोलिसांकडून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

Police Commissioner Sandeep Karnik while guiding the meeting organized on the occasion of Shiv Jayanti.
Shiv Jayanti 2024 : विश्व विक्रमी सुवर्ण होनचे काम अंतिम टप्प्यात; शिवजन्मोत्सवानिमित्त उपक्रम

उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनीही पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच महापालिका, वीज वितरण विभागाचे अधिकारी यांना रस्ता दुरुस्ती आणि वीज पुरवठा खंडित होणार नाही.

याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, डॉ. सीताराम कोल्हे, आनंद वाघ, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, गजेंद्र पाटील, युवराज पत्की यांच्यासह विभागीय शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेटे, बाळा पाठक, चेतन शेलार, हनिफ बशीर, आसिफ मुलाणी, रामसिंग बावरी, राजेंद्र बागूल, नंदू कहार, संतोष नाईक यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Police Commissioner Sandeep Karnik while guiding the meeting organized on the occasion of Shiv Jayanti.
Shiv Jayanti 2024 : मिरवणुकांमुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल; वाहतूक पोलिसांचे नियोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com