Nashik News : बोटावरची शाई दाखवा अन् मोफत दाढी, किंवा हेड मसाज करा! सलून चालकानं लाढवली अनोखी शक्कल

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात नारायण संत मेन्स पार्लर अँड बॉडी मसाज सलून येथे मतदान जनजागृतीसाठी अनोखी शक्कल लढवलीय.
Narayana Sant Men's Parlour
Narayana Sant Men's Parlouresakal

Sinner : नाशिक लोकसभा मतदारसंघात नारायण संत मेन्स पार्लर अँड बॉडी मसाज सलून येथे मतदान जनजागृतीसाठी अनोखी शक्कल लढवलीय. दिनांक 20 रोजी मतदान केल्यानंतर दिनांक 20 व 21 मे रोजी बोटावरची शाई दाखवा दाढी किंवा हेड मसाज करा, असा उपक्रम त्यांनी राबवलाय. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शासनानं अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

त्यात काही सामाजिक संघटनांनी देखील खारीचा वाटा उचलला आहे. असाच एक प्रयत्न सिन्नर शहरातील नारायण संत मेन्स पार्लर अँड बॉडी मसाज येथील 'सलून'कडून करण्यात आला आहे. ज्या नागरिकांनी मतदान केलं, अशा सर्व नागरिकांना दिनांक 20 व 21 असे दोन दिवस मोफत दाढी किंवा हेड मसाज करून देण्याची त्यांनी योजना राबवली.

त्यानुसार दिनांक 20 व 21 दिवसभर बोटावरची शाई दाखवा अन् मोफत सेवा मिळवा, असा उपक्रम नारायण संत मेन्स पार्लर अँड बॉडी मसाज समूहाचे प्रमुख नारायण संत यांनी राबवला. मोफत दाढी : मतदान करणाऱ्या नागरिकांना सिन्नर येथील नारायण संत सलूनमध्ये मोफत दाढी-हेड मसाज महिलांना मोफत केशरचना करून देण्याची योजना आखली होती. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नारायण संत यांनी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनोखी योजना राबवली.

गेल्या पंधरा दिवसांपासून दुकानात येणाऱ्या ग्राहकांना या योजनेची माहिती देण्यात आली होती. मतदानासाठी कर्तव्य बजावणाऱ्या ग्राहकांना सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मोफत सेवा देण्यात आली. दिनांक 20 मे रोजी ‌ नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार असल्याने नारायण संत यांनी हा अनोखा उपक्रम राबवणार असल्याचं जाहीर केलं होतं. (latest marathi news)

Narayana Sant Men's Parlour
Nashik PM Narendra Modi : मोदींच्या सभेत कांदा शेतकर्याची मुस्कटदाबी! लासलगावात आंदोलन

त्यावरून त्यांनी मतदानाच्या तारखेच्या पंधरा दिवस आधीपासूनच जनजागृतीला सुरुवात केली. बोटाची शाई दाखवा आणि मोफत सेवा मिळवा, असं त्यांनी आपल्या ग्राहकांना सांगितलं. त्यावर अनेकांनी या योजनेचं कौतुक केलं. आम्ही मतदान करू, असं दुकान चालकाला सांगितलं.

बेटी बचाव, बेटी शिक्षण...

ज्या घरात २०/ ५ / २०२४ ते २०/८/ २०२४ या तारखे पर्यंत ज्या घरात मुलगी जन्माला येईल तीच्या वडिलांची कटिंग, दाढी एक वेळ फ्रि करण्यात येईल. मुलगी हि असा आर्शिवाद आहे कि ती एका घरात जन्म घेते व दोन्ही घरात प्रकाश करते म्हणुन मुलगी हि प्रत्येक घरात असली पाहिजे. सगळ्यांना घरात सुन हवी असते, आई हवी असते, बहिण हवी असते, मग तर मुलगी का नको म्हणुन आत्ता तरी जागे व्हा मुली वाचवा मुलगी शिकवा मुलगी शकली प्रगती झाली. असे आव्हान केले आहे.

Narayana Sant Men's Parlour
Nashik Eknath shinde Road Show : मुख्यमंत्र्यांचा गंगापूर रोडवर आज रोड शो! नाशिक शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com