Nashik News : सप्तशृंगी गडाच्या शीतकड्यावरुन दरीत उडी घेत युवक अन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

Nashik News : घटनेस साधारण सहा दिवस होवून गेलेले असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.
death
deathesakal

वणी : आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावरील शीतकड्यावरुन सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सप्तशृंगी गडावर मंगेश राजाराम शिंदे वय 24 वर्ष रा. भायाळे ता. चांदवड जि. नाशिक व अल्पवयीन मुलगी हे मोटर सायकल क्र. MH-15-HJ-5915 ने वडनेर भैरव ता. दिंडोरी जि. नाशिक येथुन दि. 28/04/2024 रोजी येथुन वणी सप्तश्रृंगी गड येथे आले होते. (young boy minor girl took extreme step saptashrungi gad)

death
Crime News: ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त, निवडणुकीसाठी आणली होती रक्कम?

सप्तशृंगी गडावर अज्ञात कारणाने या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शीतकडा येथे येवून सुमारे चारशे ते पाचशे फुट खोल दरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. शीतकड्यावरुन उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह हे झाडाला अडकलेला तर मुलाचा मृतदेह दरीत कोसळलेला आढळला. घटनेस साधारण सहा दिवस होवून गेलेले असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.

याबाबत भातोडे, ता. दिंडोरी चे पोलिस पाटील विजय चव्हाण यांना गुराख्यांनी माहिती दिल्यानंतर वणी पोलिसांत खबर दिली. वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड अशा दरी चढून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. सदर युवक व युवतीचे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहीती असून याबाबत पोलिस अधिक चौकशी करीत आहे.

death
Cyber Crime: इंस्टाग्रामवर एक क्लिक अन् महिलेने गमावले 2.7 कोटी रुपये; काय आहे प्रकरण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com