Khadi Gramodyog (file photo)
Khadi Gramodyog (file photo)esakal

Khadi Gramodyog : खादी ग्रामोद्योगामुळे देशात साडेनऊ लाख नवीन नोकऱ्या

Khadi Gramodyog : खादी ग्रामोद्योगामुळे देशात साडेनऊ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याची माहिती केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोजकुमार यांनी दिली.

Nashik News : खादी ग्रामोद्योगामुळे देशात साडेनऊ लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्याची माहिती केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोजकुमार यांनी दिली. नवीन खादीने ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला नवी दिशा दिली असून, गेल्या नऊ वर्षांत खादी उत्पादनांच्या विक्रीत चार पटीने वाढ झाल्याने ग्रामीण भारतातील कारागीर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाल्याचे, तसेच भारत तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाचा सिहांचा वाटा असेल, असेही त्यांनी सांगितले. (Nashik Nine and a half lakh new jobs in country due to khadi Gram industry)

खादी ग्रामोद्योग आयोग नाशिक केंद्रातर्फे कार्यक्रमांचे आयोजन सातपूर येथे केले होते. या वेळी ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो लाभार्थ्यांना मधुमक्षिकापालन पेटी प्रशिक्षण, महिलांना विद्युत टूल कीट, स्वयंचलित पेपर प्लेट बनविण्याची मशिन, तसेच विद्युतचलित चाकाचे वाटप अध्यक्ष मनोजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे केंद्रीय उपकार्य अधिकारी पी. नलमुतू, संचालक योगेश भांबरे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, डहाणू केंद्राचे प्राचार्य किरण उईके, संदीप कोते, सहायक निदेशक सुनील वीर यांच्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतील लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. (latest marathi news)

Khadi Gramodyog (file photo)
Nashik ZP News : चारपेक्षा अधिक निविदांची फाइल आता निविदा समितीकडे : डॉ. अर्जुन गुंडे

मनोजकुमार यांनी सांगितले, की ‘वोकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मंत्रामुळे खादीला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळाली आहे. ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत आतापर्यंत २७ हजारांहून अधिक कुंभार समाजातील बंधू-भगिनींना विद्युत चलित चाकाचे वाटप केल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली आहे.

तर मध अभियान योजनेंतर्गत आतापर्यंत २० हजार लाभार्थ्यांना दोन लाखांहून अधिक मधमाशांच्या पेट्या आणि मधमाशांच्या वसाहतींचे वाटप केले आहे. सध्या देशभरात तीन हजारांहून अधिक खादी संस्था कार्यरत आहेत, ज्याद्वारे पाच लाखांहून अधिक खादी कारागीर आणि कामगारांना रोजगार मिळत आहे.

महाराष्ट्रातील ३१ खादी संस्थांच्या माध्यमातून एक हजार ४०० हून अधिक कारागिरांना रोजगार मिळत आहे. गेल्या आर्थिक वर्षात येथील ६० खादी आउटलेट्सवर २६ कोटींहून अधिक खादीची विक्री झाली आहे.

Khadi Gramodyog (file photo)
Nashik Adivasi Morcha : अंमलबजावणीच्या खात्रीशिवाय माघार नाही; लाल वादळाचा मुक्काम वाढला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com