Nashik NMC News : उपाययोजनांसाठी नव्याने खर्चाची तयारी! बांधकाम विभागाने केलेला खर्च संशयाच्या गर्तेत

Nashik News : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल मिरची येथे झालेल्या अपघातानंतर महापालिकेकडून शहरात ३३३ गतिरोधक बसविण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
NMC News
NMC Newsesakal

Nashik NMC News : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल मिरची येथे झालेल्या अपघातानंतर महापालिकेकडून शहरात ३३३ गतिरोधक बसविण्याची कारवाई सुरू करण्यात आली. त्यासाठी जवळपास साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात आला. परंतु मार्गावर गतिरोधकसंदर्भात सूचनाफलक, थर्मोप्लास्टिक व्हाइट पेंट व कॅटआइज सारख्या उपाययोजना केल्याने यासाठी नव्याने खर्च करण्याची तयारी बांधकाम विभागाने सुरू केल्याने याबाबत संशय निर्माण झाला आहे. (Nashik NMC Preparation of new expenses for measures news)

पंचवटी विभागातील छत्रपती संभाजी महाराज महामार्गावर ऑक्टोबर २०२२ मध्ये अपघात होऊन त्यात जवळपास १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल घेत नाशिकमधील अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या.

त्याअनुषंगाने महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, वाहतूक पोलिस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सदस्यांच्या समितीने सर्वेक्षण केले. यामध्ये शहरात २६ ब्लॅक स्पॉट, तर ३३३ ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे सुचविण्यात आले. अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना सुचविण्यासाठी रेझिएंन्ट इंडिया या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती.

कंपनीने उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना देताना या ठिकाणी गतिरोधक बसविले जातील तेथे सूचनाफलक तसेच थर्मोप्लास्टिक व्हाइट पेंट व कॅटआईज या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने गतिरोधक बसवून इतर उपाययोजना करण्यासाठी जवळपास साडेसहाशे कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला.  (latest marathi news)

NMC News
Nashik NMC News: बळी जाऊनही उपाययोजनांचा विसर! राज्याच्या गृहसचिवांनी मागितली माहिती; मनपा प्रशासनाचे धाबे दणाणले

मात्र ३३३ ठिकाणी गतिरोधक बसविल्यानंतर सूचना फलक व अन्य उपाययोजना न केल्याने बांधकाम विभागाने केलेला खर्च संशयात सापडला आहे. रस्ते सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार ३३३ गतिरोधक बसविले तेथे सूचना फलक, थर्मोप्लास्टिक पेंटचे पट्टे मारणे, कॅट आय बसविणे, रोड मार्कर, हॅजार्ड मार्कर या उपाययोजना बंधनकारक आहे. त्यामुळे या कामांची देखील पाहणी करणार असल्याचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी सांगितले.

विभागनिहाय बसविलेले गतिरोधक

विभाग गतिरोधक संख्या

पूर्व ६८

पश्चिम ३६

पंचवटी ८९

नाशिक रोड ४८

सिडको ६०

सातपूर ३२

एकूण ३३३

NMC News
Nashik NMC News : महापालिकेची अग्निशमन यंत्रणा ढासळली! शिकाऊ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर अग्निसुरक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com