Nashik NMC News : कर सवलत योजना कायम! गाळे थकबाकीदारांवरील कारवाई सुरुच राहणार

Nashik News : महापालिकेकडून दरवर्षी दिली जाणारी कर सवलत योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
NMC News
NMC Newsesakal

नाशिक : महापालिकेकडून दरवर्षी दिली जाणारी कर सवलत योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाळेधारकांवरील थकबाकी वसुल करण्यासाठी गाळे जप्तीची कारवाईही केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे प्रभारी उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली. (Nashik NMC Tax discount Scheme Continued marathi news)

महापालिकेला यंदा मालमत्ता कराच्या माध्यमातून चांगले उत्पन्न प्राप्त झाले. मार्चअखेर २०६ कोटी रुपयांचे उत्पन्न तिजोरीत जमा झाले. त्यात कर सवलत योजनेतून उत्पन्नाचा वाटा अधिक असल्याने या वर्षीदेखील कर सवलत योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एप्रिल महिन्यात घरपट्टीच्या रकमेत ८ टक्के, मेमध्ये ६ टक्के, तर जून महिन्यात ३ टक्के अशी सवलत योजना आहे. ३० जूनपर्यंत सवलत योजना सुरू राहील. सवलतीच्या महिन्यात महापालिकेच्या कर विभागाकडे मालमत्ता करातून जवळपास २५ टक्के रक्कम जमा होते. (latest marathi news)

NMC News
Finance Ministry: नव्या करप्रणालीत बदल नाही; समाज माध्यमांवरील संदेशांवर अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण

त्यामुळे महसुलाच्या बाबतीत दिलासा मिळतो. मागील वर्षात २ लाख १६ हजार २४० मिळकतधारकांना योजनेचा लाभ मिळाला होता. सवलत योजनेतून ९०. ७७ कोटी रुपयांचा महसुल मिळाला होता. त्यामुळे यंदादेखील सवलत योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन कर भरणा केल्यास अतिरिक्त दोन टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. सौरऊर्जा, सोलर प्रकल्प, पाण्याचा पुनर्वापर संदर्भातील सवलतीत कोणत्या तरी एकाच सवलतीचा लाभ करदात्यांना दिला जाणार आहे.

गाळे जप्ती मोहीम

महापालिका हद्दीमध्ये जवळपास २९०० ओटे, गाळेधारक आहे. त्यांच्याकडे जवळपास ५१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च कालावधीत १०.३० कोटी रुपये वसुल झाले. ४१.३० कोटी रुपये वसुल करण्यासाठी मार्चअखेरही गाळे जप्तीची मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. अशी माहिती प्रभारी उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली.

NMC News
Nashik News : लायब्ररी ऑन व्हिलमधून सावानाची तिसरी शाखा! गुढीपाडव्याला उद्घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com