Nashik News : मुस्लिम महिलांची प्रभागात हंडा रॅली!

Nashik : रमजान महिना सुरू असताना, मुलतानपुरा भागात दहा दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने संतप्त मुस्लिम महिलांनी सोमवारी (ता. २५) डोक्यावर उलटे हंडे घेऊन प्रभागातून रॅली काढली.
A handa march was taken out by angry women in Multanpura area on Monday.
A handa march was taken out by angry women in Multanpura area on Monday.esakal

Nashik News : रमजान महिना सुरू असताना, मुलतानपुरा भागात दहा दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने संतप्त मुस्लिम महिलांनी सोमवारी (ता. २५) डोक्यावर उलटे हंडे घेऊन प्रभागातून रॅली काढली. महिलांनी घोषणाबाजीही केली. पालिकेकडून पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. सोमवारी धुलिवंदन असल्याने पालिकेला सुट्टी होती. (Nashik no water in taps for ten days Muslim women took out handa rally from ward)

यामुळे मुलतानपुरा भागातील महिलांनी पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा न नेता प्रभागातून रिकामे हंडे डोक्यावर उलटे घेत निषेध रॅली काढली. रॅलीत समीना शेख, यास्मिन शेख, नर्गिस शेख, इना अन्सारी, आपरीन नवसारी, फातिमा अन्सारी यांच्यासह मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिकामे हंडे वाजवून निषेधाच्या घोषणाही दिल्या.

आज पाणी न सोडल्यास, उद्या पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा नेण्याचा इशारा महिलांनी दिला. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असून, उपवास सुरू आहेत. रोजा सोडण्यासाठी पाणी मिळत नसल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून मुलतानपुरा भागात नियमितपणे साफसफाई होत नसल्याची तक्रारही महिलांनी केली. (latest marathi news)

A handa march was taken out by angry women in Multanpura area on Monday.
Nashik Vegetables Rate Hike : पालेभाज्या, फळभाज्यांना आला ‘भाव’! उन्हामुळे आवक घटत चालल्याचा परिणाम

पालखेडचे पाणी अगोदर येवल्याला द्या

येवला शहराला पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावाने तळ गाठला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून साठवण तलाव व परिसरातील विहिरींवरून शहराला पाणीपुरवठा होत आहे. आता पाणीटंचाईची परिस्थिती बिकट झाली आहे.

पालिकेकडून इतर भागांचा पाणीपुरवठा बंद ठेऊन रात्री उशिरपर्यंत मुस्लिम भागात पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. पालखेड धरणातून येवला शहर, मनमाड शहर, मनमाड रेल्वे, ३८ गावे पाणीयोजनांसाठी सोमवारी सायंकाळी कालव्याला पाणी सोडले.

हे पाणी शहराच्या साठवण तलावात गुरुवारी पहाटे येण्याची चिन्हे आहेत. त्यात मनमाड रेल्वेचा साठा संपल्याने त्यांनी आम्हाला प्रथम पाणी द्यावे, अशी मागणी ‘पालखेड’कडे केली आहे. त्यामुळे मनमाड रेल्वेला आधी पाणी दिल्यास शहराच्या साठवण तलावात कधी पाणी पोचते, यावरच शहराचे पाणी संकट अवलंबून आहे. टंचाईची दाहकता पाहता येवल्याच्या तलावात अगोदर पाणी देण्याची मागणी होत आहे.

A handa march was taken out by angry women in Multanpura area on Monday.
Nashik Success Story : शेतकऱ्याचा मुलगा बनला विस्तार अधिकारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com