Bad smell spread due to sewage water coming into the road in the area
Bad smell spread due to sewage water coming into the road in the areaesakal

Nashik News : वारंवार तक्रार करूनही अधिकारी घेईना दखल; दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे महाले फार्म रहिवासी त्रस्त

Nashik News : महाराणा प्रताप चौक महाले फार्म येथे गेल्या दोन वर्षापासून महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे आणि आता आचारसंहिता लागल्यामुळे सिडकोतील नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत

सिडको : महाराणा प्रताप चौक महाले फार्म येथे गेल्या दोन वर्षापासून महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे आणि आता आचारसंहिता लागल्यामुळे सिडकोतील नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच महाले फार्म परिसरामध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर पसरले असून, परिसरात सर्वदूर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. वारंवार तक्रार करूनही याकडे मनपा अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. (Nashik Mahale Farm suffer due to foul smelling water marathi news)

महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे महाले फार्म परिसरातील समस्यांवरून दिसून येते. नाशिक महापालिका एकीकडे स्मार्टसिटीचा मोठा गाजावाजा करते, त्यासाठी करोडो रुपये खर्ची घातली जात आहेत.

मात्र, शहर स्मार्ट होण्याऐवजी अधिकच भकास होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाले फार्म परिसरातील समस्या बघून जाणवते. नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि आणि त्या समस्यांचे तातडीने निराकरण करणे, ही महापालिकेची जबाबदारी आहे.

असे असताना ढिम प्रशासन आणि सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचा समस्यांमुळे जीव जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराणा प्रताप चौक महाले फार्म परिसरातील नागरिकांची अवस्था सध्या अशीच झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिसरातील ड्रेनेजलाइन समस्येचे निराकरण झालेले नाही. . (latest marathi news)

Bad smell spread due to sewage water coming into the road in the area
Nashik News : कठडा नसल्याने पूल बनला धोकादायक

गेल्या महिनाभराच्या कालावधीत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी साधे फिरकलेले नाही. समस्या सुद्धा सोडविलेल्या नाहीत. ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्तावर येत असल्याने नागरीकांना येताना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

ड्रेनेज सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे परिसरात डासांचा प्रादूर्भाव वाढला असून, आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिका प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून तुंबलेल्या ड्रेनेजलाइन प्रश्न तातडीने सोडवावा, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. महापालिका प्रशासनाने सदर प्रश्‍न वेळीच न सोडविल्यास महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा परिसरातील नागरीकांनी इशारा दिला आहे.

Bad smell spread due to sewage water coming into the road in the area
Nashik Lok Sabha Code of Conduct : आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा : रवींद्र जाधव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com