Nashik Water Storage : जिल्ह्यातील धरणांत केवळ 9 टक्केच साठा शिल्लक! नाशिकमधील धरण क्षेत्रात मुसळधार पावसाची प्रतीक्षा

Nashik News : जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना संपत आला, तरी अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नसल्याने पाण्याची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.
Nashik Gangapur Dam
Nashik Gangapur Damesakal

Nashik News : जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना संपत आला, तरी अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नसल्याने पाण्याची परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांत फक्त दोन टक्के साठा वाढला. जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण केवळ नऊ टक्के साठा शिल्लक आहे. (Only 9 percent of stock left in dams of district)

जिल्ह्यात मॉन्सूनचे वेळेत आगमन झाले खरे. मात्र, जूनअखेरपर्यंत पुरेसा पाऊस झालेला नाही. पूर्व भागातील तालुक्यांत दमदार पाऊस झालेला असला, तरी पश्चिम पट्ट्यात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनमध्ये सरासरी १४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली; तर जुलैमध्ये ३५.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण छोटी-मोठी २२ धरणे आहेत.

सध्या या धरणांमध्ये फक्त नऊ टक्के साठा शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सात टक्के साठा या धरणांमध्ये होता. पावसाळा सुरू झाल्यावर केवळ दोन टक्केच साठ्यात वाढ झाल्याची परिस्थिती आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही फक्त २२ टक्के साठा आहे. त्यामुळे आगामी काळात मुसळधार पाऊस न झाल्यास पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. शहरात गत काही दिवसांपासून पाऊस बरसतो.

मात्र, नाशिककरांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात एकूण नऊ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी ५ जुलैला जिल्ह्यातील धरणसाठा २६.५१ टक्के होता. गत वर्षाच्या तुलनेत नाशिकचा पाणीसाठा तब्बल १७.५१ टक्क्यांनी कमी आहे. (latest marathi news)

Nashik Gangapur Dam
Nashik ZP News : जिल्हा परिषदेचा 46 टक्के निधी खर्च! निधी खर्चाचे प्रशासनासमोर आव्हान

जिल्ह्यात पाऊस वेळेत होत नसल्याने पेरण्यांना फटका बसला. याशिवाय, पावसाळ्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. खराब वातावरणामुळे फळबागांना आणि भाजीपाल्याला रोगराईचा फटका बसतो. सध्या पिकांचे उत्पादन कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

जिल्ह्याच्या धरणांतील साठा

गंगापूर धरण समूहातील गंगापूर धरणात २२.५८ टक्के साठा उपलब्ध आहे; तर कश्यपी धरणात ५.७२, आळंदीत १.९६, गौतमी गोदावरीत १०.९७ टक्के साठा शिल्लक आहे. पालखेड धरण समूहातील पालखेडमध्ये १४.८५, करंजवणमध्ये १.८१, वाघाडमध्ये २.८७, भावली धरणात १७.७८, मुकणे तीन, वालदेवी धरणात ५.२१ टक्के साठा शिल्लक आहे. दारणा धरणात ३४.६६ टक्के, भावलीत ३०.६८, मुकणेत ४५.७२, वालदेवीत १९.१५ टक्के साठा शिल्लक आहे.

Nashik Gangapur Dam
Nashik Police Recruitment Written Test : पोलीस भरतीची आज लेखी परीक्षा! शहराची KTHM तर ग्रामीणची भुजबळ नॉलेज सिटीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com