esakal | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : .....तर यामुळे घडले असावे मृत्यूतांडव!

बोलून बातमी शोधा

nashik oxygen leak
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : .....तर यामुळे घडले असावे मृत्यूतांडव!
sakal_logo
By
संपत देवगिरे

नाशिक : नाशिकच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायूमुळेच रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीला झालेल्या गळतीमुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण ही घटना घडण्यामागे नेमके काय कारण असावे याबाबत विविध कयास लावले जात आहेत. वाचा सविस्तर

.....तर यामुळे घडले असावे मृत्यूतांडव!

नाशिकच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात दिडशेहून अधिक रूग्ण उपचार घेत होते. त्यात तेवीस रुग्ण लाईफ सपोर्टीव्ह (व्हेंटीलेटर) उपचारावर होते. सकाळी अकराला रुग्णालयाच्या केंद्रीत ऑक्सीजन पुरवठ्यासाठी बसविलेल्या टाकीत ऑक्सीजन रिफीलींग करण्यासाठी ड्युरो टॅंक आला होता. फिलींगच्या कॅाकला पाईप जोडल्यानंतर प्रेशर कॅाक सुरु करण्यात आला. यावेळी टाकीला व टॅंकरच्या पाईपला कनेक्ट करणारा व्हॅाल्वचे थ्रेड व्यवस्थित नव्हते. थ्रेड ढिले असल्याने ऑक्सीजनच्या उच्च दाबामुळे पाईप नीट कनेक्ट न झाल्याने टाकीत न जाता बाहेर पसरला. फिलींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गोंधळामुळे ही त्रुटी झाली असावी, असा कयास आहे.

हेही वाचा: प्राणवायूनेच घेतला जीव; ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेवर काय म्हणाले नेते

पुरवठा बंद झाला अन् अनेकांच्या लक्षातच नाही

दरम्यान रिफीलींगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मते रिफीलींगची टाकी आली त्याआधीच ऑक्सीजनची गळती होत होती. ती दुरूस्त करम्यासाठी तंत्रज्ञांनी टाकी असलेल्या बंदीस्त भागाच्या जाळीचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या मते त्यची दुरुस्ती केली होती. त्यानंतर रिफीलींग करताना गळती झाल्याने काय करावे या गोंधळात कोणीतरी टाकीतून रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला होणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा बंद केला. हा पुरवठा बंद झाला आहे, हे अनेकांच्या लक्षातच आले नाही. जवळपास दिड तास प्राणवायू बंद असल्याने व्हेंटींलेटरच्या कृत्रीम प्राणवायूवर (लाईप सेव्हींग सिस्टीम्स) असलेल्या रुग्णांचा ऑक्सीजन बंद झाला. त्यात श्वास कोंडून ते अत्यावस्थ झाले. यावेळी एकतीस रुग्ण व्हेंटीलेटरवर होते. यातील बावीस रुग्णांचा मृत्यू झाला. प्राणवायू घेत असलेल्या अन्य रुग्णांची प्रकृती देखील खालावली.अन्य 161 रुग्ण येथे दाखल होते असे सांगण्यात आले. यादरम्यान रुग्णालयात विस्कळीतपणा निर्माण झाला. त्यात सगळ्यांचीच धावपळ उडाली. त्यात रुग्णांचे नातेवाईक देखील होते. या सर्व धावपळीत अनुभवी डॅाक्टर्स, पिरचारीका, रुग्ण या सगळ्यांचाच गोंधळ झाला. त्या दरम्यान बावीस रुग्णांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: ''महाराष्ट्र शोकमग्न आहे! सांत्वन कसे करू? अश्रू कसे पुसू?''

तर कदाचीत या त्रुटी टाळता आल्या असत्या.

या सर्व प्रकरणात तांत्रीक चुक व रुग्णांच्या नातेवाईकाचा गोंधळ यात दुर्देवी प्रकरणात कोरोनाचा उपचार घेत असलेल्या बावीस रुग्णांना मात्र आपले प्राण गमवावे लागले. या विषयाच्या भावनीक व प्रशासकीय गोंधळात महापौर हे या यंत्रणेचे प्रमुख असतात. लोकप्रतिनिधी म्हणून शहराचे हे प्रथम नागरिक मात्र कुठेही दिसले नाहीत. महापालिका आयुक्त लोकांपासूनच नव्हे तर प्रशासनातील अधिकाऱ्यांपासूनही दूरच होते.या टाकीची गळती आधीपासून सुरु होती असे सांगम्यात आले. त्यामुळे याआधीच या रुग्णालयाच्या त्रुटींबाबत लक्ष घातले असते, तर कदाचीत या त्रुटी टाळता आल्या असत्या. महापालिका पदाधिकाऱ्यांनी बाहेर पडावे, शहरातील स्थितीकडे लक्ष घालावे अशी मागणी व दबाव गेले महिनाभर शहरात होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. मुळ तांत्रीक बाबीसह मुख्य विषयाची चर्चा न होता भावनिक विषयाचा गोधळ अधिक होता. तो कधी निवळणार याची प्रतिक्षा आहे. बावीस रुग्णांच्या कुटुंबियांवर झालेल्या आघातातून त्यांना धीर देण्याची गरज या सगळ्यांत जास्त प्राधान्याची आहे.

.