esakal | बुधवारची दुपार नाशिककरांसाठी भयान शांततेची; अजूनही अनेकांचे जीव टांगणीला

बोलून बातमी शोधा

nashik hospital
बुधवारची दुपार नाशिककरांसाठी भयान शांततेची; अजूनही अनेकांचे जीव टांगणीला
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात भयान शांतता पसरली आहे. अद्यापही उपचार घेणाऱ्या शेकडो रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. रुग्णालयातील भयान शांततेमुळे घरी मरण पत्करणे बेहत्तर, अशी प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत. \

हेही वाचा: धडपड, आक्रोश अन्‌ हुंदक्‍यांनी नाशिक सुन्न! रुग्णालयात अंगावर काटा आणणारे दृश्‍य

बुधवारची दुपार नाशिककरांसाठी भयान शांततेची

बुधवारची दुपार नाशिककरांसाठी भयान शांततेची ठरली. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवरील रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. १२ पुरुष व दहा महिलांचा या घटनेत मृत्यू झाला. साधारण ६ एप्रिलपासून मृत रुग्ण दाखल होते. व्हेंटिलेटरच्या माध्यमातून मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना कक्षात प्रवेश नसला तरी ते एकमेकांच्या संपर्कात होते. स्वतःच्या रुग्णाबरोबरच बाजूच्या बेडवरील रुग्ण कसा आहे, याची आस्थेवाईक चौकशी केली जात होती. सेवा मिळते का, डॉक्टर येतात का, याबाबत चौकशी करताना एकमेकांना नातेवाईक मदत करत होते.

उपचार घेणाऱ्या शेकडो रुग्णांचा जीव टांगणीला

ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांपैकी चार रुग्णांना सर्वसाधारण वाॅर्डात दाखल केले जाणार होते. कोरोना महामारीच्या भयावह परिस्थितीत सर्वच जण सहजपणे तारून जाऊ, असा एकमेकांना विश्‍वास दिला जात होता. परंतु, कोरोना नाही, तर सुलतानी संकटाने तरी मरू, अशी पुसटशी कल्पनाही नसलेल्या मृत रुग्णांना प्राणवायूचा अपुरा पुरवठा करून मृत्यूने गाठेलच.

मृत्यूबाबत संशय

सकाळी एकमेकांना नाश्‍त्याची विचारपूस करणाऱ्या अचानक 24 जणांना मृत्यूने कवटाळल्यानंतर रुग्णालयात भयान शांतता पसरली आहे. रुग्णालयात उपचार घेतानादेखील मृत्यूबाबत संशय निर्माण होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण रुग्णालय व रुग्णालयाबाहेर दिसून आले.