Girish Mahajan
esakal
पंचवटी (नाशिक) : भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून, ते देशाच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) दिलेल्या संविधानामुळेच भारत जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून समर्थपणे उभा आहे. विद्यार्थ्यांनी हे संविधान फक्त वाचू नये, तर आपल्या विचारांत आणि कृतीतही उतरवावे, हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले.