Nashik Onion Auction : कांदा लिलावात सहभाग घ्या, अन्यथा परवानेच रद्द करणार

Onion Auction : गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत बंद असलेले कांदा लिलाव शुक्रवार (ता.१२) पासून सुरू होणार आहे.
Onion Auction
Onion Auctionesakal

Nashik Onion Auction : गेल्या आठ दिवसांपासून लासलगाव बाजार समितीत बंद असलेले कांदा लिलाव शुक्रवार (ता.१२) पासून सुरू होणार आहे. दरम्यान, लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार रद्द करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत देण्यात आला. (Nashik Participate in Onion Auction otherwise license will be cancelled marathi news)

जिल्हा उपनिबंधकांच्या ८ एप्रिलच्या पत्रानुसार व्यापारी प्रचलित पद्धतीने सहभागी न झाल्यास पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने व आवश्यक उपाययोजना निर्माण करण्याच्या दृष्टीने ज्या परवानाधारकांना प्रचलित पद्धतीने लिलावात कामकाजात सहभागी व्हायचे आहे त्यांनी शुक्रवारपासून लिलावात सहभागी व्हावे, असा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला.

मात्र, तसे न झाल्यास जिल्हा उपनिबंधकांनी लिलाव प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल. बाजार समितीने पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, व्यापाऱ्यांना दिलेल्या सुखसुविधा तत्काळ काढून घेण्यात याव्यात, असेही जिल्हा निबंधकांनी पत्रात नमूद केले असून, या आदेशाचे पालन केले जाईल, अशी भूमिका संचालक मंडळाने घेतली आहे.

दरम्यान, प्रतिसाद देणाऱ्यांना लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाने ज्या व्यापाऱ्यांनी परवान्यासाठी बाजार समितीकडे मागणी केली आहे त्यांना तत्काळ परवाने देण्यात येतील. प्रसंगी विंचूर उपबाजार समितीच्या व्यापाऱ्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले..(latest marathi news)

Onion Auction
Nashik Onion Auction : पुन्हा सुट्टयांमुळे लिलाव बंदच! शेतकरी वैतागले

बैठकीला सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, संचालक जयदत्त होळकर, संदीप दरेकर, डॉ. श्रीकांत आवारे, छबुराव जाधव, सोनिया होळकर, महेश पठाडे, राजेंद्र बोरगुडे, प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते.

परवाने रद्द करु नका म्हणजे झाले!

दरम्यान, लासलगाव बाजार समितीच्या संचालक मंडळासोबत विंचूरच्या व्यापाऱ्यांची गुरुवारी (ता. ११) सकाळी बैठक झाली. आज बाजार समिती परवाने देत आहे. मात्र, उद्या अन्य व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्यासाठी आमचे परवाने रद्द करण्याची अट घातल्यास परवाने रद्द करु नका, तरच आम्ही लिलावात सहभाग घेऊ, असे यावेळी परवान्यासाठी इच्छूक व्यापाऱ्यांनी सांगितले.

''व्यापारी व हमाल यांच्यातील लेव्हीवरुन सुरु असलेल्या वादाचा फटका कांदा उत्पादकांना बसत आहे. कांदा काढणी सुरू आहे. पुढील पाच-सहा दिवसात पाऊस सांगितलाय. कांदा बाजारात नेऊन विकणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असताना व्यापारी व मापाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने व संबंधित विभागाने तत्काळ तोडगा काढावा.''- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Onion Auction
Nashik Onion Auction : नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कांदा लिलाव बंद; जिल्हा व्यापारी असोसिएशनचा निर्णय

''लिलावानंतर व्यापाऱ्यांच्या गोदामावर मोठ्या प्लेट काट्यावर पूर्ण ट्रॉलीचे वजन केले जाते. नंतर पाठीमागील फाळके खोलून हायड्रोलिकने ट्रॉली वर करून कांदा खाली केला जातो. येथे हमालांना काहीही कष्ट करावे लागत नाहीत. मापाऱ्यांना दर गोणीप्रमाणे वजन घ्यावे लागत नाही, तरी तोलाई घेतली जाते. काहीच काम न करता शेतकऱ्यांकडून हमालीचे चारशे रुपये प्रत्येक ट्रॉलीला, तोलाईचे दर क्विंटलला ५.५० पैसे व त्यावर ३२ टक्के लेव्ही असे जवळपास ७ रुपये शेतकऱ्यांच्या पट्टीतून वजा केले जातात. प्लेट काट्यावर वजन करण्याचा ४० रुपये खर्चही शेतकरीच करतो. असे सुमारे चारशे रूपये बिनकामाचे द्यावे लागतात. ही पद्धत मोडीत काढावी.''- अनिल घनवट, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष

''संख्येने कमी असूनही संघटीत असल्यामुळे बाजार समित्यांमध्ये हमाल, मापारी, व्यापारी या घटकांचा दबदबा निर्माण झाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या जीवावर उत्पन्न मिळवतात त्याच शेतकऱ्यांना नाडण्याचे काम संबंधित घटकांकडून होत आहे. ही एक प्रकारची मक्तेदारीच आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहण्यामागे दोन्हीही घटक जबाबदार असून, बाजार समित्यांचे कारभार बघणारेही फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. लेव्हीचा प्रश्‍न न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला असताना त्यासाठी थेट बाजार समित्या बंद ठेवण्याचे काहीही कारण नाही.''- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना

Onion Auction
Nashik Onion Auction : लिलाव बंदच्या आडून खासगी बाजार समित्यांना बळ; व्यापाऱ्यांची भूमिका संशयास्पद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com