Nashik Onion Auction : नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कांदा लिलाव बंद; जिल्हा व्यापारी असोसिएशनचा निर्णय

Onion News
Onion Newsesakal

Nashik Onion Auction : नाशिक जिल्हा कांदा व्यापारी वर्गाच्या समस्यांबाबत व्यापारी असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री व पणनमंत्र्यांना निवेदन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने एका दिवसात साधारणतः ३० ते ४० कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर

दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. (Onion auction closed in Nashik district from tomorrow news)

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कुठलाही सकारात्मक तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

व्यापाऱ्यांच्या मागण्या मंगळवार (ता. १९)पर्यंत मान्य न झाल्यास नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे सदस्य बुधवार (ता. २०)पासून कांदा लिलाव कामकाजात सहभागी होणार नाहीत, असा निर्णय जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलाणी, व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष खंडू देवरे, कांदा व्यापारी संतोष अट्टल, प्रवीण कदम, ऋषी सांगळे, अतुल शहा, सुरेश बाफना, नवीनकुमार सिंग यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनच्या मागण्या अशा ः

- बाजार समितीने आकारलेल्या मार्केट फीचा दर प्रतिशेकडा १०० रुपयास एक रुपयाऐवजी १०० रुपयास ०.५० पैसे या दराने करण्यात यावा.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion News
Onion Subsidy: कांदा अनुदानाचा पहिला हप्ता खात्यात वर्ग होण्यास सुरवात

- आडतीचे दर संपूर्ण भारतात एकच चार टक्के दराने आडतीची वसुली विक्रेत्यांकडून करण्याची पद्धत करण्यात यावी.

- कांद्याची निर्यात होण्यासाठी ४० टक्के ड्यूटी तत्काळ रद्द करण्यात यावी.

- ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’मार्फत कांद्याची खरेदी मार्केट आवारावर करून विक्री रेशनमार्फत करण्यात यावी

- केंद्र व राज्य शासनाला कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापारावर सरसकट पाच टक्के सबसिडी व देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी.

- कांदा व्यापाऱ्यांची चौकशी बाजारभाव कमी असताना करावी. बाजारभाव वाढल्यानंतर चौकशी करू नये.

"ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे मिळतील हेच ते दिवस होते. टोमॅटोनेही मार दिल्याने तोंडचे पाणी पळाले होते. एकीकडे दुष्काळाचे सावट असताना सणासुदीच्या तोंडावर बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतमाल विक्री करण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे." - योगेश रायते, कांदा उत्पादक, खडक माळेगाव

Onion News
Onion Export Duty : कांदा, तांदळाच्या कमी निर्यात मूल्यांकनावर नजर; शुल्क वाचविण्याचे प्रकार निदर्शनास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com