Nashik: पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकभरतीत फेरबदलाचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवित्र पोर्टल

नाशिक : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकभरतीत फेरबदलाचे संकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : संस्थाचालक महामंडळाबरोबर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी व शिक्षण विभागाचे अधिकारी यांची ऑनलाइन व ऑफलाइन बैठक गुरुवारी (ता. ११) झाली. त्यात आयुक्त सोळंकी यांनी संस्थाचालकांची बाजू ऐकून घेत पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रणालीत फेरबदलाचे संकेत दिले.

शिक्षकभरती करताना पवित्र पोर्टलचा प्रणालीमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात कारवाई शिक्षण विभाग करणार त्याचप्रमाणे शिपाईपदे पूर्ववत ठेवणे शिपायांना केअरटेकर म्हणून संज्ञा देणे वेतनेतर अनुदान ५ टक्क्यांवरून १० टक्के वाढविण्याबाबत पावले उचलणे यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील, कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्यासह पुणे, नगर, मुंबई येथील संस्थाचालकांनी ऑनलाइन व ऑफलाइन सहभाग नोंदविला होता. यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकभरतीचा मुद्दा जास्त चर्चिला गेला.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

त्यामुळे ऑनलाइन स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पवित्र पोर्टलमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात. शिक्षण संस्था महामंडळाचे नाशिक येथील १५ व १६ नोव्हेंबरचे अधिवेशन झाल्यावर तातडीची बैठक घेऊन नोव्हेंबर महिन्याच्या आत ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली. संस्थाचालकांची बाजू त्यांनी व्यवस्थित ऐकून घेत यावर सकारात्मक तोडगा निघेल. नोव्हेंबरअखेरीस पवित्र पोर्टलमध्ये फेरबदल होतील, असा या बैठकीनंतर विश्वास वाटत आहे.

-बाळासाहेब पाटील, शिक्षणसंस्था महामंडळ कार्यकारिणी सदस्य

loading image
go to top