Ganeshotsav 2022 : नाशिककरांनी अनुभवला 2 वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganeshotsav 2022

Ganeshotsav 2022 : नाशिककरांनी अनुभवला 2 वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव

जुने नाशिक : कोरोना प्रादुर्भावामुळे हरवलेले नाशिक यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांना अनुभवास मिळाले. पूर्वीप्रमाणे नागरिकांनी बिनधास्त निर्बंधमुक्त शहरातील विविध भागात मुक्तसंचार करून गणेशोत्सवातील देखावे बघण्याचा आनंद घेतला. गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावाने सर्वत्र निर्बंध होते. सामाजिक सोहळ्यांसह सणावरदेखील निर्बंध आले होते. (Nashik people experience 2 years ago corona before Ganeshotsav 2022 Nashik Latest Marathi News)

प्रशासनाकडून प्रत्येक गोष्टीवर बंदी लावण्यात आली होती. नागरिकांनीदेखील भीतीपोटी बाहेर पडणे टाळले होते. २०१९-२० मध्ये लॉकडाऊन होते. २०२१ मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. परंतु, भीतीपोटी आणि सरकारच्या असलेल्या सूचनांमुळे गणेशोत्सवासह सर्वच सण साध्या पद्धतीने साजरी करावी लागले.

प्रादुर्भावाच्या भीतीत दोन वर्ष नाशिक जणू कुठेतरी हरवले गेले होते. यंदा सर्व निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मंडळांची संख्यादेखील वाढली आहे. त्यांच्याकडून आकर्षक असे देखावे उभारण्यात आले आहे. नागरिकांमध्येही उत्साह असल्याने पहिल्या दिवसापासूनच नागरिकांनी देखावे बघण्यासाठी गर्दी केली होती.

हेही वाचा: Nashik : अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्याकांड प्रकरणी तिघांना जन्मठेप

शेवटचे दोन दिवस तर देखावे बघण्यासाठी नागरिकांचा जनसागर उसळल्याचे दिसून आले. शहराच्या प्रत्येक रस्त्यावर मध्यरात्रीपर्यंत देखावे बघण्यासाठी, तसेच देखावे बघून परतणाऱ्यांची वर्दळ दिसून आली. दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीचे वातावरण सर्वत्र होते. कोरोना प्रादुर्भावाचे दोन वर्ष सोडल्यानंतर या वर्षी पुन्हा तशाच पद्धतीचे वातावरण शहरात सर्वत्र दिसून आले.

नागरिकांना कुठेतरी दोन वर्षानंतर हरवलेले नाशिक पुन्हा अनुभवास मिळाले. असे वाटत होते. पूर्वीप्रमाणेच कुटुंबातील चिमुकल्यांना घेऊन विविध ठिकाणचे देखावे बघण्यास गर्दी, प्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दी, मिरवणुकीसाठी सहभागी मंडळाकडून विविध प्रकारच्या तयारीत मस्त असणे, ढोल पथकाकडून सराव करणे, अशा विविध प्रकारची कामे जी गेली दोन वर्षे झाली नाही ती यंदा होताना दिसली. पुन्हा एकदा पूर्वीचे नाशिक अनुभवास मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा: 2 लाख नाशिककरांचा ‘Walk Excercise’चा नित्यनियम!

Web Title: Nashik People Experience 2 Years Ago Corona Before Ganeshotsav 2022 Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..