CMA Exam : ‘सीएमए’ परीक्षेतही नाशिककरांची छाप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CMA Exam

CMA Exam : ‘सीएमए’ परीक्षेतही नाशिककरांची छाप!

नाशिक : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया‍यातर्फे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या ‍परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

या परीक्षेत नाशिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. इंटरमिजिएट परीक्षेत २३, तर अंतिम परीक्षेत नाशिकचे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (Nashik people impression in CMA exam nashik news)

वाणिज्य क्षेत्रात सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या सीएमए परीक्षेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. संस्थेतर्फे कॉस्ट अॅन्ड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) या शिक्षणक्रमाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा घेतली जाते.

बारावीनंतर सर्वप्रथम फाउंडेशन परीक्षा, त्यानंतर इंटरमिजिएट व त्यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अंतिम (फायनल)साठी पात्र होतात. डिसेंबर सत्राच्या जानेवारीत ऑफलाइन झालेल्या या परीक्षांचा निकाल मंगळवारी (ता. २१) जाहीर झाला.

‘आयसीएमएआय’च्या नाशिक शाखेचे अध्यक्ष भूषण पागेरे, विद्यार्थी विकास समितीचे अध्यक्ष अरिफखान मन्सुरी, व्‍यावसायिक विकास समितीचे अध्यक्ष कैलास शिंदे, जनसंपर्क समितीचे अध्यक्ष निखिल पवार, उपाध्यक्ष दीपक जगताप, सचिव अर्पिता फेगडे, खजिनदार मयूर निकम, स्वप्नील खराडे, दीपक जोशी आदींनी यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

अंतिम परीक्षेत अनिल, पूजा, प्रणित, अंकुर, चेतन उत्तीर्ण

नाशिक शाखेतून इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण ४०५ विद्यार्थी प्रविष्ट होते. यापैकी २३ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. नाशिक शाखेतून फराज शेखने प्रथम, मंगेश साबळेने द्वितीय आणि अभिषेक राऊत याने तृतीय क्रमांक पटकावला.

सीएमए फायनल परीक्षेला १४२ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्‍यापैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अनिल खैरनार, पूजा बोथरा, प्रणित जैन, अंकुर भूषण, चेतन शिंदे अशी यशस्‍वी झालेल्‍या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

टॅग्स :Nashik