

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनेक वर्षांपासून अडकलेल्या ठेवी व त्यावरील व्याज मिळावे, यासाठी शहरातील महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, माजी नगरसेवक समीर कांबळे यांच्यासह ठेवीदारांनी बँकेच्या प्रशासकांसमोरच गुरुवारी (ता. २८) ठिय्या मांडला. जिल्ह्यातील सहकारी बँका व पतसंस्थांचे सुमारे दोन हजार ३०० कोटी रुपये थकीत आहेत, त्याच्या वसुलीसंदर्भात बँकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला.