Nashik News : पिंपळगाव ग्रामपंचायतीला बॅनरबाजीतून मिळाले 3 लाख

भाऊ, दादाच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव शहरातील चौका-चौकात बॅनर, होर्डिंगचे उदंड पीक आले होते.
banner (file photo)
banner (file photo)esakal

Nashik News : भाऊ, दादाच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव शहरातील चौका-चौकात बॅनर, होर्डिंगचे उदंड पीक आले होते. बॅनरमधून स्वत: किंवा आपल्या नेत्यांना प्रकाशझोतात आणण्याचे फॅडच पिंपळगाव शहरात आहे. असे असले तरी ही बॅनरबाजी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पथ्यावर पडली आहे. कारण गेल्या आठ महिन्यांत बॅनरबाजीतून ग्रामपंचायतीला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. (Nashik Pimpalgaon Gram Panchayat received 3 lakhs from banner auction marathi news)

शिवाय कर आकारणीमुळे चौकाचौकात उभारण्यात येणाऱ्या होर्डींगला चाप बसला आहे. पिंपळगाव बसवंत शहर हे राजकीय पंढरी म्हणून ओळखले जाते. ज्येष्ठ, दिग्गज, तरुण नेत्यांची येथे कमी नाही. नेता होऊन राजकीय पटलावर झळकण्यासाठी गल्ली बोळातील तरुण विविध उपक्रमांतून स्वत:ला प्रसिद्धी झोतात आणतात.

असा सर्वत्र प्रचलीत असलेला बॅनरबाजीचा फंडा पिंपळगावच्या नेत्यांमध्ये अधिकच लोकप्रिय आहे. निफाड फाटा, रुचा हॉटेल, चिंचखेड व उंबरखेड चौफुली, छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर आदी भागांत वाढदिवसासह सण, उत्सवाच्या शुभेच्छांचे फलक लावण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू असते. यातून शहराचे विद्रूपीकरण तर होतेच शिवाय वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळे येतात.

सरपंच भास्करराव बनकर यांनी ग्रामपंचायतीचे सूत्र हाती घेतल्यानंतर बॅनरबाजीला चाप लावण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीत भर पडावी म्हणून शक्कल लढविली आहे. वाढदिवस व इतर शुभेच्छांसाठी प्रत्येक दिवसाला एक बॅनरला ७५ रुपये कर आकारला जातो. तर व्यावसायिक बॅनरसाठी पंधरा दिवसाला दीड हजार रुपयांचा कर घेतला जातो.  (latest marathi news)

banner (file photo)
Nashik News : सारडा सर्कल- मुंबई नाका मार्गास भंगार वाहनांचा वेढा!

संबंधित बॅनरचा ग्रामपंचायतीकडे कर भरून ती पावती बॅनरच्या कोपऱ्याला छापणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यात एक हजार बॅनर शहरात लावण्यात आले. त्यातून तीन लाख रुपयांचे उत्पन्न ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा झाले आहे. कर भरल्याशिवाय बॅनर लावायचे नाही, अशी ताकीद संबंधितांना दिली आहे.

धार्मिक व दु:खदला सवलत

शुभेच्छा व व्यावसायीक वस्तूच्या फलकांला कर आकारताना ग्रामपंचायतीने धार्मिक सोहळे, निधन, दशक्रिया विधी यांच्या बॅनरचा सहानुभूतिपूर्वक विचार करून कोणताही कर आकारला जात नाही.

''माझ्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी शहरात बॅनर उभारले होते. त्यांनाही कर आकारला आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह कुणालाही यातून सवलत दिली जात नाही. ग्रामपंचायतीला उत्पन्नाबरोबरच शहरात बॅनरबाजीमुळे होणाऱ्या विद्रुपीकरणाला चाप बसला आहे.''- भास्करराव बनकर (सरपंच, पिंपळगाव बसवंत)

banner (file photo)
Nashik News : 5 दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा; शिवपुरी चौकातील महिला वर्गात संतप्त भावना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com