Nashik News : तृषार्तांसाठी दिले खासगी विहिरीचे पाणी; दुष्काळी स्थितीत आदिवासी बांधवांसाठी सनी थोरात यांचे औदार्य

Nashik News : आदिवासी बांधवांची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून युवा शेतकरी सनी रमेश थोरात यांनी त्यांच्या विहिरीचे पाणी या भागातील आदिवासी बांधवांना उपलब्ध करून दिले आहे.
Tribal brothers came to fill water at Sunny Thorat's water table.
Tribal brothers came to fill water at Sunny Thorat's water table.esakal

पिंपळगाव : सर्वत्र पाणीटंचाईचे सावट असून जो तो पाण्याचा शोधात वणवण भटकत आहे. पिंपळगाव (वा.) सह तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अशा परिस्थितीत येथील फॉरेस्ट परिसरातील आदिवासी बांधवांची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून येथील युवा शेतकरी सनी रमेश थोरात यांनी त्यांच्या विहिरीचे पाणी या भागातील आदिवासी बांधवांना उपलब्ध करून दिले आहे. (Pimpalgaon Young farmer Sunny Ramesh Thorat has made his well water available to tribal brothers)

दरवर्षी देवळा पूर्व भाग परिसरात उन्हाचे चटके व पाणीटंचाई गंभीर रूप धारण करत आहे. यंदा मोठे स्रोत कोरडे पडल्याने तीव्रता वाढली आहे. परिसरातील नागरिकांसह मुक्या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अंत्यत गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पिण्यापुरते पाणी उपलब्ध आहे.

असे लोक आता नागरिकांची तहान भागविण्यासाठी पुढे आले आहेत. पिंपळगाव (वा.) येथील फॉरेस्ट परिसरात अनेक आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. मालेगाव रस्त्यालगत असलेल्या सपाटदरी परिसरात युवा शेतकरी सनी थोरात यांची शेतजमिन आहे. (latest marathi news)

Tribal brothers came to fill water at Sunny Thorat's water table.
Nashik News : दत्ता कराळे पुन्हा नाशिक परिक्षेत्राचे ‘आयजी’!

त्यांच्या विहिरीला पिण्याजोगे पाणी आहे. महिन्यांपासून सनी थोरात यांच्या विहीर व पाणवठ्यावर आदिवासी बांधव पाणी भरण्यासाठी तसेच आपले जनावरे पाणी पाजण्यासाठी येत आहेत.

ऐन टंचाईच्या काळात थोरात यांनी आदिवासी बांधवांची तृष्णा भागविल्याने त्यांचे कौतुक कऱण्यात येत आहे. वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण ही सेवा पुरवत असल्याचे सनी थोरात यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Tribal brothers came to fill water at Sunny Thorat's water table.
Nashik Police : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरविल्यास कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com