Nashik News : बेपर्वा दुचाकीचालकांवर दंडुका; मालेगावचे पोलिस सरसावले

Nashik : शहर व परिसरात दुचाकी दुचाकी चोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला असून दरदिवशी एक दुचाकी चोरीला जात आहे.
Officers and employees of the traffic branch and the city police force while taking action against the vehicle owners at the ATT High School intersection on Kidwai Road in the city.
Officers and employees of the traffic branch and the city police force while taking action against the vehicle owners at the ATT High School intersection on Kidwai Road in the city.esakal

Nashik News : शहर व परिसरात दुचाकी दुचाकी चोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला असून दरदिवशी एक दुचाकी चोरीला जात आहे. दुचाकी चोर व पोलिसांचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतानाच या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन प्रथमच ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सहाय्यक पोलिस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांच्या उपस्थितीत शहर वाहतूक पोलिस व शहर पोलिसांनी किदवाई रस्त्यावरील एटीटी हायस्कूल चौकात गुरुवारी (ता.२५) रात्री दुचाकी व तीनचाकी वाहन चालकांविरुद्ध धडक कारवाई केली. ( police administration has come into action mode for thieves )

यात ६२ गुन्हे दाखल करून ४२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनचालकांवर प्रथमच व्यापक कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे बेपर्वा दुचाकी वाहनधारकांवर वचक बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहर आणि वाहतूक नियम व शिस्तीचा येथे सुतराम संबंध नाही. पोलिसांनी याविरुद्ध मोहीम उघडतानाच काल रात्री विनाक्रमांक प्लेट, विना परवाना वाहन चालविणारे, ट्रीपल सीट, दुचाकी, तीनचाकीचे कागदपत्रे नसलेले अशा वाहनांची नाकाबंदी करून चौकशी केली.

यात विना क्रमांकांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. श्री. संधू यांच्या उपस्थितीत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप, शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे आदींसह वाहतूक शाखेचे व शहर पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन तास ही कारवाई केली. अचानक कारवाई सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. (latest marathi news)

Officers and employees of the traffic branch and the city police force while taking action against the vehicle owners at the ATT High School intersection on Kidwai Road in the city.
Nashik News : जिल्ह्यात एक हजार 73 उद्योजकांना उभारी; उद्योग केंद्राच्या माध्यमातून 50 कोटींची गुंतवणूक

शहरात असंख्य वाहने विना नंबर प्लेटची फिरतात. बहुसंख्य वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. ट्रीपल सीट सर्रास चालविले जाते. गाडीचे कागदपत्र जवळ बाळगले जात नाहीत. आगामी काळात शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अचानकपणे या पद्धतीने मोहीम राबवून विना परवाना, विना नंबर प्लेट व कागदपत्र जवळ न बाळगणाऱ्या दुचाकीसह अन्य वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

''मालेगावात ही मोहीम निरंतर सुरू असेल. वाहनचालकांनी वाहन परवान्यासह दुचाकी व वाहनाचे सर्व दस्तऐवज समवेत बाळगावे. विना नंबर प्लेट वाहने रस्त्यावर फिरवू नयेत, अन्यथा त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले.''- तेगबिरसिंह संधू, सहाय्यक पोलिस अधीक्षक, शहर विभाग

Officers and employees of the traffic branch and the city police force while taking action against the vehicle owners at the ATT High School intersection on Kidwai Road in the city.
Nashik News : वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com