esakal | नाशिक : विधानसभा सदस्य असल्याचे भासवणारा तोतया लोकसेवक गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

nashik police arrested a man pretending to be an assembly member

नाशिक : विधानसभा सदस्य असल्याचे भासवणारा तोतया लोकसेवक गजाआड

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : गाडीवर विधानसभा अधिवेशन कालावधीकरीता वाहन प्रवेश पास लोगोचा स्टीकर लावुन व लोकप्रतिनिधी तसेच शासकीय वाहन असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत लोकांची फसवणूक करणाऱ्या तोतयास वणी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे लेटर पॅड, तसेच माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांचे ओळखपत्राचा गैरवापर करीत मंत्र्याशी जवळचे संबघ असल्याचे भासवत शाळा अनुदानित करुन देण्यासाठी दीड लाखांची रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. या तोतया लोकसेवकास न्यायालयाने ३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीची आधारे त्यांनी वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत यांना तसेच गुन्हे शाखेकडील असलेल्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानूसार २९ तारखेस रात्री १ वाजेच्या सुमारास वणी पोलीस ठाणे हद्दीत शिंदवड गावाच्या त्रिफुलींवर संशयीत आरोपी राहुल दिलीपराव आहेर, वय ३२ वर्षे रा. शिंदवड ता. दिंडोरी जि. नाशिक याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील सिल्वर रंगाची इनोव्हा गाडी क्रमांक एमएच १५ डीएम ४१७५ वर पुढील व मागील बाजूस काचेवर राजमुद्रा असलेलाकेवळ अधिवेशन कालावधीकरीता वाहन प्रवेश पास नावाच्या लोगोचे स्टीकर लावुन शासकीय वाहन भासवत होता.

हेही वाचा: रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच

इतकेच नाही तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नावाचे कोरे नोटपॅड तसेच माजी आमदार अनिल कदम यांचे विधानसभा सदस्यांचे ओळखपत्र, त्यांचा फोटो असलेले व स्वतःचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय प्रवेश पत्रिका तयार करून त्याचा गैरवापर केला. विधानभवनामध्ये आमदार शिक्षणमंत्री व इतर मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत असे भासवून आमदार व माजी आमदार यांची कागदपत्र तसेच शाळा अनुदानित करतो अशा भुलथापा देवून त्यांच्या कडून रोख रक्कम रुपये १,५०,०००/ घेतल्याप्रकरणी वणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद प्रकरणी वणी पोलीस स्टेशनला भादविसं कलम १७१ १७१९, ४२०, ४६८, ४६९ सह राजमुद्रा प्रति कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात तोतया राहुल दिलीपराव आहेर वय ३२ वर्षे रा. शिंदवड ता. दिंडोरी जि. नाशिक यांना अटक करण्यात आलेली असून दिनांक ०३/०९/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण सचिन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत हे करीत आहेत. सदर कामगिरी मध्ये सहापोउपनि गुरळे, पाटील, पोहवा वराडे, सानप, जगताप, खराटे, मासुळे, बहिरम सामिल होते.

हेही वाचा: नाशिक : भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी अखेर शिवसैनिकांना जामीन

loading image
go to top