Nashik Police Commissionerate: पोलिस आयुक्तालयास प्रतिक्षा नवीन अधिकाऱ्यांची

Nashik Police Commissionerate
Nashik Police Commissionerateesakal

Nashik Police Commissionerate : राज्यातील सहायक पोलिस आयुक्त तथा उपअधीक्षकांच्या जम्बो बदल्या होऊन आठवड्याचा कालावधी उलटला आहे.

नाशिक शहर आयुक्तालयात नव्याने पाच सहायक पोलिस आयुक्त नियुक्त केले, परंतु एकच अधिकारी हजर झाले असून उर्वरित अधिकाऱ्यांची आयुक्तालयास प्रतिक्षा कायम आहे. त्यातच, आयुक्तालयातील एक सहायक आयुक्त निवृत्त झाले आहेत. तर आणखी काही अधिकारी सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत. (Nashik Police Commissionerate waiting for new officers)

२३ मेस गृहविभागातील सहाय्यक पोलिस आयुक्त तथा उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यातील काही अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेमध्ये बदल नंतर केले.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातही नव्याने पाच सहायक पोलिस आयुक्तांची नव्याने नियुक्त्या केल्या. यातील एकाही अधिकाऱ्याने आपल्या पदस्थापनेत बदल केलेला नाही. असे असतानाही डॉ. सीताराम कोल्हे वगळता एकही सहायक आयुक्त अद्याप हजर झालेले नाहीत.

डॉ. कोल्हे हे नाशिक आयुक्तालयातच नाशिक सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक होते. पदोन्नतीने बदली होताच ते आयुक्तालयात सहायक आयुक्तपदी हजर झाले असून, त्यांच्याकडे मुख्यालयाच्या प्रशासन कक्षाची जबाबदारी सोपविलेली आहे. यामुळे नवीन सहायक आयुक्त हजर होताच आयुक्तालयात मोठ्याप्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

यांची प्रतिक्षा कायम

नाशिक ग्रामीणमधील निफाडचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेतील शेखर देशमुख, बृहन्मुंबईतून नितीन जाधव, तर, चिपळूनचे उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांची नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात सहायक आयुक्तपदी बदली झाली आहे. या बदल्यांना आठवडा उलटला तरीही सदरचे अधिकारी अद्याप हजर झालेले नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Police Commissionerate
NDCC Farmers Yojana : शेतकरी सभासदांसाठी ‘किसान अर्थ सहाय्य योजना’! थकबाकी वसुलीसाठी पाऊल

या जागा रिक्त

आयुक्तालयातील युनिट तीनचे सहायक आयुक्त सोहेल शेख यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली झाली आहे तर, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सीताराम गायकवाड हे बुधवारी (ता. ३१) सेवानिवृत्त झाले. यासह विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष या जागा रिक्त असून, याठिकाणी सहायक आयुक्तांची आवश्‍यकता आहे.

उपायुक्तांचीही प्रतिक्षा

गेल्या मार्च महिन्यात मुख्यालयाच्या उपायुक्त पौर्णिमा श्रींगी-चौघुले यांची बदली झाली. तेव्हापासून रिक्त असलेल्या या पदाची अतिरिक्त जबाबदारी गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्याकडे आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अकोल्याच्या अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांची नाशिकला बदली झाली आहे. परंतु त्यांना अद्याप मूळ ठिकाणावरून मुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्षा कायम आहे.

Nashik Police Commissionerate
ZP Cess Fund : जि.प. सेसमधून प्रशासकीय खर्चावर भर; प्रशासकीय राजवटीत ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com