Neet Paperleak Case नाशिक पोलिसांनी सुतावरून गाठला स्वर्ग, तासाभरात शुभम ताब्यात; नीट पेपरफुटी प्रकरणी कशी केली कारवाई?

सकाळी नऊच्या सुमारास राजस्थान पोलिसांनी संपर्क साधत नोट पेपरफुटीतील संशयित शुभम खैरनारची माहिती दिली. काही वेळातच 'सीबीआय'कडून शुभमचा एक फोटो अन् माहिती मिळाली.
NEET paper leak case CBI photo helped Nashik Police detain suspect quickly

NEET paper leak case CBI photo helped Nashik Police detain suspect quickly

Esakal

Updated on

How Nashik Police Nabbed NEET Paper Leak Suspect in One Hour नाशिक, ता. १२ : टक्कल, चष्मा, वेशभूषाही सर्वसाधारण असणारा युवक जात असताना समोरून आलेल्या एकाने नमस्कार केला... त्यानेही नमस्कार केला. काही तरी बोलायचे म्हणून त्या व्यक्तीने युवकाशी बोलण्याचा प्रयत्न केला अन् पुढे गेला. काही अंतरावरच चालणाऱ्या काहींना त्या व्यक्तीने खुणावताच एकाच वेळी आठ- दहा जणांनी युवकाला घेरलं अन् ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने शुभम सांगितले; पण खैरनार नाही, असे म्हणत पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला; पण पोलिस नजरेनेच त्याला हेरले होते...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com