Polio Vaccination : मालेगावात 3 मार्चपासून पोलिओ लसीकरण; तालुक्यासह 1 लाख 62 हजार डोसचे उद्दिष्ट

Polio Vaccination : पोलिओमुक्त भारतासाठी तीन मार्चपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
Polio Vaccination
Polio Vaccination esakal

Polio Vaccination : पोलिओमुक्त भारतासाठी तीन मार्चपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान शहर व ग्रामीण भागातील १ लाख ६२ हजार बालकांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहे. हे उद्दिष्ट यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासह महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. शून्य ते पाच या वयोगटातील १ लाख ६२ हजार बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे. (nashik Polio Vaccination in Malegaon marathi news)

प्रत्येक बूथवर आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, शिक्षक यांचेसह रोटरी टीम सहभागी होणार आहे. या पोलिओ मोहिमेत एकही बालक वंचित राहू नये, यासाठी बसस्थानके, धार्मिक स्थळे या ठिकाणी पोलिओ टीम कार्यरत राहतील.

यंदाच्या मोहिमेत सलग पाच दिवस रोटरीसह आरोग्य विभाग कार्यरत राहून पोलिओ डोसपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. शहरातील रोटरीचे चारही क्लब या मोहिमेत पाच दिवस आपल्या सदस्यांना सहभागी करणार आहेत. या संदर्भात रोटरी क्लब ऑफ मालेगाव व्हीजन यांच्या पुढाकाराने बैठक झाली.

दृष्टीक्षेपात पोलिओ मोहीम....

मालेगाव ग्रामीण क्षेत्र:

प्राथमिक आरोग्य केंद्रे ०९

उपकेंद्रे ः ५४

लाभार्थी बालक ः ४०,०००

बूथ ः ३५०

एकूण कर्मचारी संख्या: १२००

Polio Vaccination
Polio vaccine: रायगड जिल्ह्यात 32 हजार बालकांना पोलिओ डोस

महापालिका क्षेत्राचे नियोजन

नागरी आरोग्य केंद्र -१४

उपकेंद्र - १०

बुथ - ५२५

लाभार्थी बालक - १२२०००

आशा स्वयंसेविका- ३१४

अंगणवाडी सेविका- २०५

अंगणवाडी मदतनीस -२००

आरोग्य सेविका व कर्मचारी -१८०

''घरोघरी भेटी देण्यासाठी ३८० पथकांसह १६५० कर्मचारी कार्यरत राहतील. यात नर्सिंग व फार्मसी विद्यार्थी यांचेसह आंतरराष्ट्रीय रोटरीच्या शहरातील चारही क्लबची मदत घेतली जाणार आहे. लाभार्थी का वंचित आहे, याची नोंद त्यांच्या पत्त्यासह करण्यात येणार आहे.''- डॉ. अलका भावसार, वैद्यकीय अधिकारी, महापालिका मालेगाव.

Polio Vaccination
Dhule Polio Vaccination : बालकांना ३ मार्चला देणार पोलिओ लस : जिल्हाधिकारी गोयल

''रोटरी फाउंडेशन ही विश्वस्त संस्था पोलिओ निर्मूलनासाठी आर्थिक योगदान देते. रोटरीने १९८५ ला पोलिओ प्लस ही मोहीम सुरु केली. या मोहिमेमुळे लाखो मुले अपंग होण्यापासून वाचले आहेत. शहरातील बरेचसे पालक आपल्या मुलांना पोलिओचे डोस देण्यास नकार देऊ लागले. आरोग्य यंत्रणाही हतबल झाली. तिथे रोटरी सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला. यंदाच्या मोहिमेसाठी जय्यत तयारी केली आहे.''- डॉ. दिलीप भावसार, रोटरी पोलिओ टीम प्रमुख, मालेगाव (latest marathi news)

Polio Vaccination
Jalgaon Polio Vaccination : जिल्ह्यात 3 मार्चपासून पल्स पोलिओ मोहीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com