Nashik Political: जय बाबाजी भक्त परिवाराकडून शांतिगिरी महाराजांचा प्रचार सुरू! लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह

Nashik News : येत्या लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून संत जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी करावी, यासाठी जय बाबाजी भक्त परिवार आग्रही आहे.
Members of the Jai Babaji devotee family during the launch of Swami Shantigiri Maharaj's Lok Sabha election campaign from Chhatrapati Shivaji Maharaj Chowk.
Members of the Jai Babaji devotee family during the launch of Swami Shantigiri Maharaj's Lok Sabha election campaign from Chhatrapati Shivaji Maharaj Chowk.esakal

वावी : येत्या लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून संत जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी करावी, यासाठी जय बाबाजी भक्त परिवार आग्रही आहे. त्यांची उमेदवारी घोषित करून दोन आठवड्यांपासून भक्त परिवाराकडून सिन्नरसह नाशिक, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात गावोगावी प्रचारफेऱ्या काढण्यात येत आहेत. (Nashik Political Shantigiri Maharaj Lok Sabha elections marathi news)

गेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले, तरी त्यांना मिळालेल्या मतांचा आकडा निर्णायक होता. आगामी निवडणूक नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढवावी, यासाठी ‘राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी’, ही संकल्पना घेऊन जय बाबाजी भक्त परिवार आग्रही झाला आहे.

मतदारसंघातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये भक्त परिवाराकडून गावनिहाय बैठका घेण्यात येत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन निवडणुकीची वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी प्रचारफेऱ्या काढण्यात येत आहेत. शांतिगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी का करावी, यासाठी भक्त परिवाराकडून माहिती पुस्तिका वितरित करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Members of the Jai Babaji devotee family during the launch of Swami Shantigiri Maharaj's Lok Sabha election campaign from Chhatrapati Shivaji Maharaj Chowk.
Kolhapur Loksabha : कोल्हापूर-हातकणंगले कोणाला? पवारांच्या उपस्थितीत 'MVA'ची खलबते; जागा वाटपासह उमेदवारी निश्‍चितीची शक्यता!

शांतिगिरी महाराजांचे धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील योगदान, नाशिक व त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व, येणारा कुंभमेळा याकडे जय बाबाजी भक्त परिवार जनतेचे लक्ष यानिमित्त वेधत आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी मिळू शकते.

वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेतला जाईल व उमेदवारीची घोषणा होईल, असा दावा भक्त परिवाराकडून केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने आहे. त्या सर्वांच्या आग्रहाखातर शांतिगिरी महाराज नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवतील, असा विश्वासही भक्त परिवाराकडून व्यक्त केला जात आहे.

Members of the Jai Babaji devotee family during the launch of Swami Shantigiri Maharaj's Lok Sabha election campaign from Chhatrapati Shivaji Maharaj Chowk.
Loksabha Election : मंत्री नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार? म्हणाले, 'मी उमेदवार असेन की नाही हे..'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com