नाशिक: शहर व जिल्ह्यासह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृतरीत्या सुरू केलेल्या दामदुप्पट योजनेत आर्थिक गुंतवणूक केलेल्यांना संशयितांनी सुमारे एक कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष गुंतवणूकदार तक्रारदार समोर न आल्याने पोलिसांनीच तक्रार दाखल करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले.