Nashik: पोल्ट्री उद्योगाला पुन्हा उभारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

poultry business

नाशिक : पोल्ट्री उद्योगाला पुन्हा उभारी

पिंपळगाव बसवंत : कोरोना संसर्ग काळात लाखो रुपयांचे नुकसान सोसत बंद असलेला पोल्ट्री व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहे. सहा महिन्यांपूर्वी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर निफाड तालुक्यातील ३० टक्के पोल्ट्री सुरू तर ७० टक्के बंद होत्या. मात्र आता ८० टक्के पोल्ट्री सुरू झाल्या आहेत. सध्या फक्त २० टक्के पोल्ट्रीमध्ये बंद आहेत. कोरोनाकाळातील तोट्यासह विविध कारणामुळे बंद असलेल्या पोल्ट्री येत्या काही दिवसात सुरू होणार असल्याचे पोल्ट्रीचालक सांगतात. कोरोनाचे संकट झेलून पुन्हा नव्या जोमाने पोल्ट्री उद्योग उभा राहत कुकुच कु..अशी बांग दिली आहे.

कोरोनाकाळात पसरलेल्या विविध अफवांमुळे अनेकांनी काही महिन्यांसाठी आपले पोल्ट्रीफार्म बंद केले होते. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ही स्थिती निर्माण झाली. निफाड तालुक्यात बॉयलर, देशी व लेअरची एकूण ३६० पोल्ट्री फार्म आहेत. कोरोनाने तडाखा दिल्याने तीनशेवर पोल्ट्री ओस पडल्या होत्या. त्यातील २८० पोल्ट्री सुरू झाल्या आहे. यातून हजारो टन कोबड्यांचे उत्पादन होत आहे. चार हजार ७०० टन चिकनचे उत्पादन वर्षभरात होणार आहे. सव्वादोन लाख अंड्याचे उत्पादन होते.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

कोरोनामुळे पोल्ट्री चालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. सध्या व्यवसाय पूर्वपदावर येण्यात मोठे अडथळे आहेत. पक्षांसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थाचे दर वाढले आहेत. कोरोनानंतर सध्या निफाड तालुक्यातील ८० टक्के पोल्ट्री सुरू झाल्या आहेत.

- गणेश आमले, पोल्ट्रीधारक, खडक माळेगाव

कोरोनामुळे बंद असलेले पोल्ट्री व्यवसाय आता सुरू झाल्याने मुबलक प्रमाणात चिकन उपलब्ध आहे. सध्या २०० रूपये किलो दराने चिकनची विक्री सुरू आहे. हिवाळ्यात चिकनाला मागणी वाढत असल्याचा अनुभव आजवर अनुभव आहे.

- जावेद पठाण, चिकन विक्रेता

loading image
go to top