Nashik News : तहसील कार्यालयाशेजारी भरउन्हात ‘प्री वेडिंग शूट'

Nashik : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण हल्लीचे तरुण प्रेमाचा वेडेपणा कधी आणि कोठे दाखवतील याचा काही पत्ता नाही.
A photographer during a pre-wedding shoot outside the Tehsil office
A photographer during a pre-wedding shoot outside the Tehsil officeesakal

Nashik News : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण हल्लीचे तरुण प्रेमाचा वेडेपणा कधी आणि कोठे दाखवतील याचा काही पत्ता नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नाशिक तहसीलदारांच्या कार्यालयाशेजारी भर उन्हात प्री-वेडिंग शूट करत भावी दाम्पत्याने ‘हम प्यार करनेवाले कुछ भी करेंगे’ अशी झलक दाखवून दिली. एकमेकांच्या प्रेमात अकांत बुडालेल्या प्रेमीयुगलांना काळ, वेळ आणि ठिकाणांची तमाही उरत नाही. (Nashik Pre wedding shoot at near Tehsil office)

अशीच काहीशी परिस्थिती शुक्रवारी (ता. १९) नाशिक तहसील कार्यालयाभोवती दिसून आली. तापमानामुळे असाह्य उकाडा जाणवत असल्याने दुपारी घराबाहेर पडणे अशक्य होऊन बसले आहे. अशा भरदुपारच्या उन्हात भरपूर मेकअप केलेल्या तरुण-तरुणीने प्री-वेडिंग शूट केले. एकमेकांच्या हातात-हात घेत प्रेमाचे प्रतीक दिसेल अशा स्वरूपाचे शूटिंग केले. फोटोग्राफरने सांगितलेल्या पोजेस करत त्यांनी शूटिंगच मनमुराद आनंद घेतला.

प्री-वेडिंग शूटिंग म्हटले की मंदिर, नयनरम्य परिसर, गार्डन यांची निवड केली जाते. पण थेट शासकीय कार्यालयाची निवड का केली असावी, असा प्रश्‍न येथे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पडला. याशिवाय शूटींग वेळ सकाळी किंवा सायंकाळची निवडली असती तर भावी दांपत्य उन्हामुळे घामाघूम झाले नसते. (latest marathi news)

A photographer during a pre-wedding shoot outside the Tehsil office
Nashik News : पत्नीचा खून करीत, पतीने उचलले टोकाचे पाऊल

पण एकमेकांच्या प्रेमात अकांत बुडालेल्या प्रेमवीरांना उन्हाचाही त्रास जाणवला नाही. शूटिंग पूर्ण करूनच त्यांनी येथून काढता पाय घेतला. विशेष बाब म्हणजे अशा गोष्टींना शासकीय कार्यालयांच्या आवारात परवानगी आहे का, असा साधा प्रश्‍नही विचारण्याचा त्रास कोणी करून घेतला नाही.

शूटिंगला परवानगी मिळते का?

शासकीय कार्यालयांची नियमावली ठरलेली असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना परवानगी घ्यावी लागते. पण प्री- वेडिंग शूट करताना परवानगी आवश्‍यकता नाही का, असा प्रश्‍न येथे उपस्थित नागरिकांनी केला आहे.

A photographer during a pre-wedding shoot outside the Tehsil office
Nashik News : गांधीनगर क्लब परिसरात घाणीचे साम्राज्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com