RTE Admission : ‘आरटीई’साठी उद्या सोडत; जिल्ह्यात 14 हजार 842 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल

Nashik News : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाच्‍या प्रक्रियेत सोडतीची प्रतीक्षा संपली आहे.
RTE Admission
RTE Admissionesakal

Nashik News : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाच्‍या प्रक्रियेत सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळी अकराला पुणे येथून ऑनलाइन पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. यानंतर विद्यार्थी प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल. दरम्‍यान, नाशिक जिल्ह्यातून या योजनेंतर्गत प्रवेशासाठी १४ हजार ८४२ अर्ज दाखल झाले आहेत. (Right to Education Act)

आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्‍ध करून देण्याच्‍या उद्देशाने राज्‍यस्‍तरावर ही योजना कार्यान्‍वित आहे. याअंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के जागांवर लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात असतो. उपलब्‍ध जागांच्‍या तुलनेत दाखल अर्जांची संख्या अधिक राहात असल्‍याने सोडत पद्धतीने लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

दरम्‍यान, योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत यापूर्वी ३१ मेपर्यंत होती. या मुदतीत आता वाढ करताना मंगळवार (ता. ४) पर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करण्याची संधी दिली होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर आता पुढील प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. (latest marathi news)

RTE Admission
Nashik Lok Sabha Constituency : भाजप आमदारांना ‘उद्धव’ शिलेदार भारी! सत्ता नसताना संघर्षात्मक लढा उभारण्याचा दिला संदेश

त्‍यानुसार शुक्रवारी (ता. ७) सकाळी अकराला पुण्याहून सोडत काढली जाईल. यानंतर विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी करून व इतर प्रक्रिया पूर्ण करताना प्रवेश निश्‍चित करण्याची संधी मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्या‍चे चित्र

योजनेत सहभागी शाळा- ४२८

प्रवेशासाठी उपलब्‍ध जागा- पाच हजार २७१

प्रवेशासाठी दाखल अर्जसंख्या- १४ हजार ८४२

राज्‍याचे चित्र

योजनेत सहभागी शाळांची संख्या- नऊ हजार २१७

प्रवेशासाठी उपलब्‍ध जागा- एक लाख पाच हजार ३९९

प्रवेशासाठी दाखल अर्जसंख्या- दोन लाख ४२ हजार ९९७

RTE Admission
Nashik Accident News: मद्यपीची कार संरक्षण भिंत तोडून रो-हाऊसमध्ये! शिवाजीनगरमध्ये घटना; चिमुरड्यासह तिघे जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com